Home > News > अजित पवारांची कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरात सपत्निक महापूजा

अजित पवारांची कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरात सपत्निक महापूजा

अजित पवारांची कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरात सपत्निक महापूजा
X

आज पंढरपूरात कार्तिकी एकादशी साजरी करण्यात आली. यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह विठ्ठलाची महापूजा केली. यावेळी त्यांनी 'येत्या काळात महाराष्ट्रातून, देशातून, जगातून कोरोना पूर्णपणे नाहीसा कर, असं साकडं घातलं.' अशा आशयाचं ट्विट केलं. यावेळी शासकीय महापूजेचा मान प्रयागबाई व कोंडीबा टोंडगे यांना मिळाला. ते नांदेड जिल्ह्यातील निळा गावचे रहिवासी असून गेली तीस वर्षे नियमित वारी करत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबद्दलचे ट्विट देखील केले आहे. यात त्यांनी, "आज 'कार्तिकी एकादशी'निमित्त महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची सपत्नीक शासकीय महापूजा केली. श्री पांडुरंगाच्या चरणी मस्तक ठेऊन येत्या काळात महाराष्ट्रातून, देशातून, जगातून कोरोना पूर्णपणे नाहीसा कर, असं साकडं घातलं. महाराष्ट्रावरची कृपादृष्टी कायम राहू दे. शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला यश दे. प्रत्येक घरात धन-धान्य, सुख-शांती, उत्तम आरोग्याची समृद्धी येऊ दे. सगळ्या जाती, धर्म, पंथ, प्रांताचे लोक गुण्यागोविंदानं राहण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे, ती कायम राहू दे, अशी मागणी श्री पांडुरंगाकडे केली." असं म्हणत ट्विट केलं.

Updated : 15 Nov 2021 6:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top