Home > News > सावधान; झटपट लोनच्या मोहाने चिनी लोन अँप वापरत असाल तर बसेल मोठा झटका..

सावधान; झटपट लोनच्या मोहाने चिनी लोन अँप वापरत असाल तर बसेल मोठा झटका..

पोलिसांनी चिनी लोन अॅपच्या करोडो रुपयांच्या फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी देशाच्या विविध भागातून 8 जणांना अटक केली आहे. कर्ज देण्याच्या नावाखाली पैसे उकळण्यासोबतच आरोपी लोकांना धमकावत असल्याचं समोर आलं आहे..

सावधान; झटपट लोनच्या मोहाने चिनी लोन अँप वापरत असाल तर बसेल मोठा झटका..
X

ऑनलाइन पद्धतीने लोकांना गंडा घालण्याचे प्रमाण आता मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अनेक आमिषे दाखवून लोकांना फसवलं जातं जात आहे. सर्व काही ऑनलाईन करण्याच्या जमान्यात आपलं खातं कधीही रिकामा होऊ शकतात. झटपट ऑनलाईन पद्धतीने लोन मिळेल अशा पद्धतीच्या जाहिराती करून अनेक एप्लीकेशन लोकांना मोठा चुना लावत आहेत. काही चिनी ॲपच्या माध्यमातून करोडो रुपये लुटल्याची घटना नुकतीच दिल्ली पोलिसांनी चव्हाट्यावर आणली. याचा पर्दाफाश करत आठ लोकांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

तर झटपट कर्जाच्या बाबतीत, आपण देखील लोन देणाऱ्या चिनी अॅपच्या जाळ्यात अडकत नाही ना? हे आता आपल्याला लक्ष्यात ठेवले पाहिजे. कारण दिल्ली पोलिसांनी चिनी लोन अॅपच्या करोडो रुपयांच्या फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी देशाच्या विविध भागातून 8 जणांना अटक केली आहे. कर्ज देण्याच्या नावाखाली पैसे उकळण्यासोबतच आरोपी लोकांना धमकावत असल्याचं पोलिसांनी म्हंटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून चायनीज लोन अॅपच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करून त्यांना लुटण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. चीनमधून भारतात हा कोट्यवधी रुपयांचा धंदा सुरू असून, भारतात काम करणाऱ्या या चिनी लोन अॅपचे एजंट क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून परदेशात बसलेल्या त्यांच्या मालकांना पैसे पाठवतात.

चिनी लोन अँप फ्रॉड नक्की काय आहे पाहूयात..

भारतात झटपट लोन देणाऱ्या चिनी ॲपचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. हे ॲप लोन देताना कुठल्याही प्रकारचे केवायसी एप्लीकेशन किंवा लोन एग्रीमेंट न करता डायरेक्ट लोन देतात. याच गोष्टीमुळे हे ॲप भारतात इतके लोकप्रिय झाले आहेत. आपल्या मोबाईल मध्ये असलेल्या प्लेस्टोर मध्ये देखील असे अनेक चिनी एप्लिकेशन्स आहेत.

हे ॲप लोकांना गंडा कसा घालतात?

तर झटपट लोन मिळवण्यासाठी एखादा व्यक्ती हे ॲप त्याच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करतो. मात्र हे ॲप डाऊनलोड करताना महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते. कारण डाउनलोड करत असताना सर्वप्रथम ते आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट, कॅमेरा, गॅलरी या सगळ्याचे एक्सेस मागतात. आणि आपण झटपट लोणच्या लोभापायी कुठलीही गोष्ट न पाहता हे एक्सेस देतो. आणि त्यानंतर मग या ॲपच्या माध्यमातून फोन मध्ये वायरस अपडेट करून तो फोन हँग केला जातो आणि याच माध्यमातून ते त्या व्यक्तीचा पर्सनल डेटा चोरतात.

तर ते लोन देत नाहीत असं अजिबात नाही. लोन देत असताना ते जितके लोन मागितले आहे त्यापैकी 60 ते 70 टक्के देतात तर बाकीचे 30 ते 40 टक्के सर्विसचर्चाच्या नावाखाली कापले जातात. हा झाला एक भाग पण फसवणूक तर पुढे आहे. या ॲप्लिकेशनवर मिळणाऱ्या लोणची व्याजाची टक्केवारी फार मोठी असते. आणि मग साहजिकच कर्जाची रक्कम वाढते आणि मग यांचे सुरु होतो त्या व्यक्तीला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार..

तर तुम्ही देखील अशा झटपट लोन मिळवण्याच्या मोहात असाल तर सावध व्हा आणि खबरदारी बाळगा..

Updated : 5 April 2022 3:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top