Home > News > दिनेश कार्तिकची पत्नी दीपिकाचा जुळ्या मुलांच्या जन्मानंतर कमबॅक; जिंकली 2 सुवर्ण पदके...

दिनेश कार्तिकची पत्नी दीपिकाचा जुळ्या मुलांच्या जन्मानंतर कमबॅक; जिंकली 2 सुवर्ण पदके...

दीपिका पल्लीकलने अलीकडेच ग्लासगो, युनायटेड किंग्डम येथे झालेल्या जागतिक स्क्वॉश चॅम्पियनशिपमध्ये जोश्ना चिनप्पा आणि सोरभ घोषाल यांच्यासह दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. आई झाल्यानंतर 6 महिन्यांत खेळात परत मैदानात परतली आहे दीपिका..

दिनेश कार्तिकची पत्नी दीपिकाचा जुळ्या मुलांच्या जन्मानंतर कमबॅक; जिंकली 2 सुवर्ण पदके...
X

दीपिका पल्लीकलने अलीकडेच ग्लासगो, युनायटेड किंग्डम येथे झालेल्या जागतिक स्क्वॉश चॅम्पियनशिपमध्ये जोश्ना चिनप्पा आणि सोरभ घोषाल यांच्यासह दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. दीपिकासाठी मोठं यश आहे कारण ती तीन वर्षे स्क्वॉश खेळापासून दूर होती. टाइम्स ऑफ इंडियाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने सांगितले की, "माझ्या शरीरात गेल्या तीन वर्षांत खूप बदल झाले आहेत, मी पूर्वीसारखी चपळ आणि मजबूत नाही, पण माझ्यात संयम बाळगण्याची क्षमता नक्कीच विकसित झाली आहे.

2015 मध्ये क्रिकेटर दिनेश कार्तिकसोबत लग्न केले

स्क्वॉश खेळाडु दीपिका पल्लीकलने 2015 मध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटर दिनेश कार्तिकशी लग्न केले.

दिनेश कार्तिक सध्या आयपीएल 2022 मध्ये आरसीबीसाठी खेळतो आहे. दिनेश कार्तिकला आता 'आयपीएलचा धोनी' असं देखील म्हटले जात आहे.

आई झाल्यानंतर 6 महिन्यांत खेळात परत मैदानात परतली आहे दीपिका..

जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर सहा महिन्यांतच दीपिका वर्ल्ड स्क्वॉश चॅम्पियनशिपमध्ये परतली. दीपिका सोबत व घोषालसह यांनी मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले, तर जोश्ना चिनप्पासोबत तिने महिला दुहेरीत सुवर्णपदक जिंकले.

बक्षीस रक्कम महिला आणि पुरुष समान मिळण्यासाठी तिने आवाज उठवला होता.

21 सप्टेंबर 1991 रोजी जन्मलेल्या दीपिका पल्लीकलची आई क्रिकेटर आहे. दीपिकाने लहानपणापासूनच स्क्वॉश खेळायला सुरुवात केली होती. दीपिका अवघ्या १३ वर्षांची होती जेव्हा तिचा स्क्वॉश महासंघाशी वाद झाला आणि त्यामुळे तिच्यावर बंदीही घालण्यात आली.

2012 ते 2015 पर्यंत दीपिकाने नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला नव्हता. तिने महिला व पुरुष खेळाडूंना मिळणाऱ्या मानधनावरून तिने आवाज उठवला होता. पुरुष आणि महिला खेळाडूंच्या बक्षीस रकमेत 40 टक्के फरक आहे व यामध्ये जोपर्यंत बरोबरी होत नाही तोपर्यंत मी चॅम्पियनशिपमध्ये भाग घेणार नसल्याचं तिने म्हंटल होतं. अखेर 2016 मध्ये बक्षिसाची रक्कम समान झाली. आणि ती आता मैदानात परतली आहे.

Updated : 19 April 2022 8:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top