Home > News > राज ठाकरेंच्या टीकेला शिवसेनेचे प्रतिउत्तर..

राज ठाकरेंच्या टीकेला शिवसेनेचे प्रतिउत्तर..

राज ठाकरेंच्या टीकेला शिवसेनेचे प्रतिउत्तर..
X

काल राज ठाकरे यांनी झी २४ तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यानच्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी जोरदार घणाघात केला आहे. त्यांनी संपूर्ण मुलाखतीत उद्धव ठाकरे यांना टारगेट केले होते. त्यानंतर आता राज ठाकरे यांच्या टीकेला शिवसेनेने उत्तर दिले आहे. राज ठाकरे वेळ येईल तशी पलटी मारतात, हे संपुर्ण अयोध्यालाच नाही तर देशाला माहीत आहे. आजारी असल्याने आराम करावे आदरणीय उद्धव साहेब लवकरच तुम्हाला भेटायला येतील सतत आठवण काढु नये. असं म्हणत शिवसेनेच्या नेत्या अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

राज ठाकरे यांनी आजारपणानंतर काल पहिल्यांदाच दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. या मुलाखती दरम्यान ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्रप्रेमामुळेच शिवसेना बुडाली. त्याबरोबरच उध्दव ठाकरे यांना टाळी देणार का? असा सवाल केला असता उध्दव ठाकरे विश्वास ठेवण्याजोगा माणूस नसल्याचे वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. त्यामुळे पुढील काळात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अनेक घटना अवलंबून असणार आहेत. मात्र राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यानंतर राज ठाकरे यांच्या टीकेनंतर आता शिवसेना काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. तर आता शिवसेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी ट्विट करत राज ठाकरेंना प्रतिउत्तर दिले आहे. त्यांनी म्हंटल आहे की, माननीय लोक पहिले बोलतात मोदीजींबद्दल, नंतर करतात पवार साहेबांच्या मनासारखे ,वेळ येईल तशी पलटी मारतात, हे संपुर्ण अयोध्यालाच नाही तर देशाला माहीत आहे.माननीय राजसाहेबांनी आजारी असल्याने आराम करावे आदरणीय उद्धव साहेब लवकरच तुम्हाला भेटायला येतील सतत आठवण काढु नये.

Updated : 24 July 2022 6:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top