Home > News > ''अमित ठाकरे गृहमंत्री तर..'' शिवसेनेचा टोला

''अमित ठाकरे गृहमंत्री तर..'' शिवसेनेचा टोला

अमित ठाकरे गृहमंत्री तर..  शिवसेनेचा टोला
X

गृहमंत्रीपद मिळालं तर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होईल असं राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी म्हंटल्यानंतर सर्वत्र त्यांची चर्चा सुरु आहे. यावरून शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी अमित ठाकरे गृहमंत्री झाले तर ब्रिजभूषण कोण तुमचा सरंक्षण मंत्री? असा टोला अमित ठाकरेंना लगावला आहे.

काल कोकण दौऱ्यावर असलेल्या अमीत ठाकरेंनी पत्रकारांशी ऑफ कॅमेरा बोलताना आपल्याला मंत्रीपद नको आहे, ती अफवा आहे, असं म्हणत आम्हाला जर गृहमंत्री पद मिळाले तर शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा विचार करू असं म्हंटल असल्याच्या अनेक माध्यमातून समोर येत आहेत. यावरूनच शिवसेनेच्या नेत्या अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी एक ट्विट करून अमित ठाकरेंना अत्यंत मिश्किल असा टोला लगावला आहे . त्यांनी ट्विट करत म्हंटल आहे की, मनसे म्हणजे एका आमदाराची अगरबत्ती, अमित म्हणजे कार्यकर्त्यांना सोडुन घरी बसलेला गृहमंत्री. शॅडो कॅबिनेट ने अयोध्याला जाता येत नसते रे भोंगामंत्री. तुम्ही गृहमंत्री तर ब्रिजभूषण कोण तुमचा सरंक्षण मंत्री?

या सगळ्या चर्चा सुरु झाल्यानंतर कला कल्याण मध्ये अमित ठाकरेंना मंत्रिमंडळात साविष्ट होण्यास आवडेल का? असा प्रश विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या मंत्रिमंडळात साविष्ट होण्यास आवडेल असे म्हणून सर्वत्र सुरु असलेल्या चर्चेस पूर्णविराम दिला आहे.

Updated : 23 July 2022 3:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top