अभिनेत्री दिपाली सय्यद ह्या त्यांच्या वक्तव्यावरून नेहमीच चर्चेत असतात. मागच्या काही दिवसांपासून त्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी केलेले वक्तव्य असेल किंवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भोंग्यांविरोधातील भूमिकेविषयी व्यक्त केलेली मते असतील यामुळे त्या माध्यमांमध्ये व त्याहून अधिक समाजमाध्यमांवर देखील चर्चेत आहेत.
आता दिपाली सय्यद यांनी पुन्हा राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना टार्गेट केला आहे. राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावरून दिलेल्या अल्टिमेटम नंतर राज्यात अनेक मनसे कार्यकर्त्यांची धरपकड झाली. याच कारणावरून मनसेने महाविकास आघाडीवर टीका देखील केली. आता या सगळ्या प्रकरणावरून दिपाली सय्यद यांनी थेट अमित ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
दिपाली सय्यद यांनी ट्विट करत अमित ठाकरेंना काय म्हटले आहे पाहूया..
दिपाली सय्यद यांनी ट्विट करत म्हंटल आहे की, "तुम्हारे कार्यकर्ताओंको ये जो धरपकड्या है । उसमे आपके अमित ठाकरे को वगळ्या है । किधर छुप्या है अमित ठाकरे बतावो सबको" असं म्हणत अमित ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांनी सुद्धा एका पत्रकार परिषदेत पत्रकारांनी हिंदी मध्ये बोलण्यास सांगितल्या नंतर आशा प्रकारची हिंदी बोलून सुरवात केली होती. अगदी त्याच स्टाइलमध्ये दिपाली सय्यद यांनी अमित ठाकरेंवर टीका केली आहे.
तुम्हारे कार्यकर्ताओंको ये जो धरपकड्या है । उसमे आपके अमित ठाकरे को वगळ्या है । किधर छुप्या है अमित ठाकरे बतावो सबको @RajThackeray @mnsadhikrut @ShivSena
— Deepali Sayed (@deepalisayed) May 11, 2022