Home > News > "देवेंद्र फडणवीस योगी होण्यासाठी बायकोला सोडणार का?" दिपाली सय्यद यांचे वादग्रस्त विधान

"देवेंद्र फडणवीस योगी होण्यासाठी बायकोला सोडणार का?" दिपाली सय्यद यांचे वादग्रस्त विधान

"योगी होण्यासाठी बायकोला सोडावं लागतं. देवेंद्र फडणवीस योगी होण्यासाठी बायकोला सोडणार का?" असे वादग्रस्त वक्तव्य करत दिपाली सय्यद यांनी अमृता फडणवीस यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस योगी होण्यासाठी बायकोला सोडणार का? दिपाली सय्यद यांचे वादग्रस्त विधान
X

"राज्याच्या राजकारणामध्ये मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. उत्तर प्रदेशमध्ये ११ हजारांहून अधिक धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आलेत तर ३५ हजारांहून अधिक ठिकाणी भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचं निश्चित करण्यात आल्याच्या बातमी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत असणाऱ्या योगी आदित्यनाथ सरकारवर कौतुकाचा वर्षाव केलाय. राज ठाकरे पाठोपाठ आता अमृता फडणवीस यांनी देखील ऐ 'भोगी', कुछ तो सीख हमारे 'योगी' से! असं म्हणत ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारला भोगी असं म्हणत योगी सरकार कडून काहीतरी शिकण्याचा सल्ला दिला. यानंतर शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी अमृता फडणवीस यांचा या वक्तव्याला उत्तर देताना एक वादग्रस्त विधान केले आहे. दीपाली सय्यद म्हणाल्या आहेत की, "योगी होण्यासाठी बायकोला सोडावं लागतं. देवेंद्र फडणवीस योगी होण्यासाठी बायकोला सोडणार का?" अशा शब्दात त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

दीपाली सय्यद यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे. त्यांच्यावर पुण्यातील शिरूर पोलीस स्थानकात आणि जळगाव पोलीस स्थानकात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.

Updated : 30 April 2022 7:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top