Home > News > "अमृता फडणवीस माफी मागा अन्यथा.." देहविक्रीवरून केलेल्या विधानावरून दीपाली सय्यद भडकल्या......

"अमृता फडणवीस माफी मागा अन्यथा.." देहविक्रीवरून केलेल्या विधानावरून दीपाली सय्यद भडकल्या......

अमृता फडणवीस माफी मागा अन्यथा.. देहविक्रीवरून केलेल्या विधानावरून दीपाली सय्यद  भडकल्या......
X

पुण्यात भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीकडून पुण्यातील लाल बत्ती भागातील महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहूण्या म्हणून अमृता फडणवीस आल्या होत्या. यावेळी बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या की, देह विक्रीचे जे काम तुम्ही करत आहे ते प्रामाणिकपणे करत आहेत. पैशासाठी आणि गरिबीमुळे जरी तुम्ही या व्यवसायात आल्या असाल तरी देखील चांगले काम करत आहात. आता या व्यवसायाला सर्वाेच्च न्यायालयानेही पाठींबा दिला आहे. वाईट परिस्थीतीमुळे तुम्ही या व्यवसायात पडला असाल, पण तुम्ही समाजाचा एक अविभाज्य घटक आहात. भविष्यात काही वाईट प्रसंग आला तर भाजप तुमच्या पाठीशी आहे. असे म्हणत त्यांनी वेश्याव्यवसायास प्रोफेशन म्हणून स्वीकारायला हवं असं म्हंटल होतं. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून अनेक सकारात्मक, नकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेच्या नेत्या अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी त्यांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त करत, दोन दिवसांत माफी मागा अन्यथा महिला आयोगाच्या माझ्या तक्रारींना सामोरे जा! असं म्हंटल आहे.

दीपाली सय्यद यांनी ट्विट करत अमृता फडणीस यांनी केलेल्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, "अमृता फडणवीस आपण समाज्यात महिलांची प्रतिमा कशी तयार करताय? दोन दिवसात माफी मागा अन्यथा महिला आयोगाच्या माझ्या तक्रारीला सामोरे जा!"

Updated : 12 Jun 2022 1:44 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top