Home > News > उमा खापरे आणि दीपाली सय्यद यांच्यात नक्की काय वाद सुरू होता..

उमा खापरे आणि दीपाली सय्यद यांच्यात नक्की काय वाद सुरू होता..

उमा खापरे आणि दीपाली सय्यद यांच्यात नक्की काय वाद सुरू होता..
X

राज्यसभा निवडणूकीपाठोपाठ आता विधानपरिषद निवडणूकही जाहीर झाली आहे. राज्यात राज्यसभा निवडणूकीमुळे वातावरण तापले आहे. त्यातच आता विधानपरिषद निवडणूक जाहीर झाल्याने कोणत्या नेत्यांना उमेदवारी मिळणार आणि कुणाचा पत्ता कट होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापार्श्वभुमीवर भाजपने विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यात उमा खापरे यांच्या पदरी विधानपरिषदेची उमेदवारी पडली आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी उमा खापरे यांनी दीपाली सय्यद यांच्यावर टीका केल्याने त्यांचं नाव चर्चेत आले होते. आता उमेदवारी मिळाल्यानंतर दीपाली सय्यद यांनी एक ट्विट करत म्हंटल आहे की, शिवसेनेमुळे भाजपात कोणी आमदार बनत असेल तर त्याबद्दल शिवसेनेचे कौतुकच..

उमा खापरे आणि दीपाली सय्यद यांचा शाब्दिक वाद चांगलाच पेटला होता त्यानंतर आता भाजपने खापरे यांचे विधानपरिषदेसाठी नाव जाहीर केल्यानंतर दीपाली सय्यद यांनी ट्विट करत त्यांना खोचक टोला लगावला आहे. त्यांनी ट्विट करत म्हंटल की, उमा खापरे यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे आभार मानले पाहिजेत, शिवसेनेमुळे भाजपात कोणी आमदार बनत असेल तर त्याबद्दल शिवसेनेचे कौतुकच आहे. जय महाराष्ट्र

उमा खापरे व दीपाली सय्यद यांच्यामध्ये काय वाद झाला होता..

दोन आठवड्यांपूर्वी शिवसेना नेते दिपाली सय्यद आणि उमा खापरे यांच्यातील वाद चांगलाच गाजला होता. मोदींवर आक्षेपार्ह टीका केली तर घरात घुसून चोप देऊ, असं जाहीर विधान खापरे यांनी केलं होतं. त्यामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर हा शाब्दिक वाद चांगलाच तापला होता या वादात नंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी सुद्धा खापरे यांच्यावर जोरदार टीका केली होती..

उमा खापरे कोण आहेत?

उमा खापरे भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी भाजपमध्ये महिला मोर्चा प्रदेश सचिवपदासह संघटनेत विविध महत्त्वाची पदे भूषविली आहेत. भाजपमधील जुन्या नेत्या म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थक म्हणूनही ओळखल्या जातात. तसेच उमा खापरे या पिंपरी-चिंचवडच्या आहेत. त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेविका म्हणून चांगले काम केलं आहे. सलग दोनवेळा त्यांनी नगरसेविका म्हणून काम केलं आहे. 2001-2002 मध्ये त्या पिंपरी चिंचवड पालिकेत विरोधी पक्षनेत्या होत्या.

Updated : 9 Jun 2022 1:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top