सहायक पोलीस आयुक्त सुजाता पाटील लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात..
X
एसीबीच्या पथकाने सहायक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांना ४० हजार रूपयांची लाच घेताना पकडण्यात आले आहे. त्यांना अटक देखील करण्यात आली आहे. खरंतर गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक नागेश पुराणिक यांना दोन लाख रूपयांची लाच घेताना सप्टेंबर महिन्यात अटक केली होती. पुराणिक एसीबीच्या जाळ्यात अडकल्याची घटना ताजी असतानाच आता Sujata Patil या लाच घेताना रंगेहात सापडल्या आहेत.
सहायक पोलीस आयुक्त सुजाता पाटील या लाच मागत असल्याची तक्रार ACB कडे करण्यात आली होती. याच तक्रारीवरून पोलिसांनी सापळा रचला व त्यातील 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
भाडेकरूने कब्जा केलेली जागा परत मिळवून देण्यासाठी व गुन्हा दाखल करून घेण्यासाठी पाटील यांनी १ लाख रुपयांची लाच मागितली होती. सुजाता पाटील या सध्या जोगेश्वरीच्या मेघवाडी विभागातील एसीपी म्हणून कार्यरत आहेत.






