Home > News > 'D फॉर डांग्या खोकला' असं श्वेता महाले यांना ट्रोल का केलं जातं..

'D फॉर डांग्या खोकला' असं श्वेता महाले यांना ट्रोल का केलं जातं..

D फॉर डांग्या खोकला असं श्वेता महाले यांना ट्रोल का केलं जातं..
X

समाज माध्यमांवर राजकीय नेतृत्व करणाऱ्या बऱ्याच महिलांना अनेक प्रकारे ट्रोल केलं जातं. यामध्ये भाजपच्या चित्रा वाघ असतील किंवा राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर, रुपाली ठोंबरे आशा अनेक महिला नेत्यांची नावे आपल्याला सांगता येतील. आता चित्रा वाघ यांनाच बघा ना त्या करत असलेल्या मेकप पासून त्यांच्या नावऱ्यावरून त्यांना वारंवार बोललं जातं. राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांनी तर या ट्रोलर्सच्या विरोधात अनेक वेळा आवाज उठवला आहे. त्यांना तर हे ट्रॉलर्स अगदी अर्वाच्च भाषेत ट्रोल करत होते. या सगळ्यांबरोबरच या ट्रोल गँगच्या निशाण्यावर आमदार श्वेता महाले देखील नेहमी असतात. त्यांनीसुद्धा काही मत व्यक्त केलं की ही गॅंग त्यांना ट्रोल करते. ही गॅंग त्यांना 'D फॉर डांग्या खोकला' म्हणून नेहमी ट्रोल करते. तर श्वेता महाले याना अशा प्रकारे का ट्रोल केलं जातं ते देखील पाहुयात..


भाजपच्या आमदार श्वेता महाले या वारंवार समाजमाध्यमांवर चर्चेत असतात. सध्या विधिमंडळात ज्या महिला आमदार आहेत त्यातील एक सक्रीय महिला आमदार म्हणून श्वेता महाले यांच्याकडे पाहिले जाते. जनतेच्या हिताचे अनेक प्रश्न घेऊन त्या वारंवार आवाज उठवत असतात. हे करत असताना समाज माध्यमांवर त्यांना अनेक वेळा ट्रोल करण्यात येतं. अनेक वेळा त्यांनी अशा ट्रॉलर्सचा सामना केला आहे. त्यांना नेहमीच एका गोष्टीवरून ट्रोल केलं जातं ते म्हणजे 'D फॉर डांग्या खोकला' म्हणून. त्यांनी कुठलेही मत व्यक्त केलं तर कमेंट बॉक्समध्ये आपल्याला 'D फॉर डांग्या खोकला' ही कमेंट पाहायला मिळतेच मिळतेच.









आता तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल की, त्यांची प्रत्येक पोस्ट असेल किंवा माध्यमांनी केलेल्या बातम्यांच्या कमेंट बॉक्समध्ये ही ' D फॉर डांग्या खोकला' अशी कमेंट का केली जाते? असं म्हणत लोक त्यांना ट्रोल का करतात? तर असं आहे की, काही वर्षांपूर्वी त्या माध्यमांना प्रतिक्रिया देत होत्या.. या ठिकाणी बोलत असताना त्या देवेंद्र या शब्दाचा अर्थ सांगत होत्या. ते सांगत असताना त्यांनी सुरवातीला म्हंटल की, D फॉर डेव्हलपमेंट.. त्यानंतर त्या थोड्या गोंधळल्या व त्यांनी पुन्हा D फॉर असं म्हंटल..नक्की काय म्हणावं हे त्यांना देखील समजलं नाही आणि त्या काही वेळ शांत बसल्या..व त्या खोकू लागल्या. आता त्यांनी वेळ मारून नेण्यासाठी खोकला आल्याचं नाटक केलं असेल पण हे सगळं घडलं होतं ते माध्यमांसमोर. मग काय या समाज माध्यमांचा युगात ते व्हायरल तर होणारच.

त्यांचा हा व्हिडिओ समाज माध्यमांवर इतका व्हायरल झाला झाला की त्यावर हजारो मीन्स बनवले. त्यामुळेच त्यांची कुठल्याही पोस्ट असेल किंवा माध्यमांनी केलेल्या बातम्यांवर कमेंट बॉक्समध्ये एखादी तरी D फॉर डांग्या खोकला अशी कमेंट आजदेखील दिसेलच. खरतर बाईट देताना त्या त्यावेळी काय बोलायचं हे विसरल्या असतील पण म्हणून एखाद्या व्यक्तीला अशा एखाद्या गोष्टीवरून समाजमाध्यमांवर किती कंट्रोल केले जाणार आहे कोणास ठाऊक?

Updated : 18 Jun 2022 7:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top