Latest News
Home > News > मोठी बातमी! भारतात आता लहान मुलांनाही Vaccination ; २ ते १८ वर्षांच्या आतील मुलांसाठी Covaxin ला मान्यता

मोठी बातमी! भारतात आता लहान मुलांनाही Vaccination ; २ ते १८ वर्षांच्या आतील मुलांसाठी Covaxin ला मान्यता

मोठी बातमी! भारतात आता लहान मुलांनाही Vaccination ;  २ ते १८ वर्षांच्या आतील मुलांसाठी Covaxin ला मान्यता
X

देशात कोरोनावरील लसीकरणाला वेग आला आहे, आतापर्यंत सुमारे ९५ कोटी नागरिकांनी कोरोनाचे एक किंवा दोन डोस घेतले आहेत. पण लहान मुलांसाठीची लस अजून आलेली नसल्याने लहान मुलांना कोरोना संसर्गाचा धोका असल्याची चिंता पालकांना सतावत आहे. पण आता देशभरातील कोट्यवधी लहान मुलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारत बायोटेक आणि ICMR यांनी मिळून तयार केलेली Covaxin लस आता २ ते १८ वर्षांच्या आतील मुलांना देण्यास परवानगी देण्यात आली आहे.

भारत बायोटेकने Covaxin च्या १८ वर्षांच्या आतील मुलांवरील दुसऱ्या आण तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सप्टेंबरमध्ये केल्या होत्या. तसेच यासंदर्भातील माहिती देशाच्या औषध महानियंत्रकांकडे सुपूर्द केली होती. त्यानंतर सखोल आणि सविस्तर अभ्यास केल्यानंतर तज्ज्ञांच्या समितीने या लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे.

मुलांना किती दिवसात लस देता येणार

Covaxin लस मुलांना देण्यासाठी प्रौढांप्रमाणे कालावधी नसले. तर यासाठी पहिला डोस घेतल्यानंतर मुलांना २० दिवसांनी दुसरा डोस दिला जाईल असे तज्ज्ञांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

कोरोनावरील लसीकरणासाठी स्थापन कऱण्यात आलेल्या तज्ज्ञांची समितीने भारत बायोटेकची Covaxin लस लहान मुलांना देण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता लहान मुलांचे लसीकऱणही वेगाने होऊउ शकेल. देशात अजूनगही काही कंपन्यांतर्फे लहान मुलांसाठीच्या लसींवर काम सुरू आहे. कोरोनाचे निर्बंध शिथिल कऱण्यात आल्यानंतर तसेच सण उत्सवांनंतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती असल्याने हा निर्णय कोट्यवधी पालकांना दिलासा देणारा ठरु शकतो.

दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने आतापर्यंत Covaxin ला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता दिलेली नाही. भारत बायोटेकने यासंदर्भातली सर्व माहिती आणि कागदपत्रे जागतिक आरोग्य संघटनेला ९ जुलै रोजी सुपूर्द केली आहेत. पण अजून जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही

Updated : 12 Oct 2021 8:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top