Home > News > बोगस प्रमाणपत्र बनवून पत्नीला सरपंच करणाऱ्या भाजप आमदाराला न्यायालयाने पाठवलं तुरुंगात

बोगस प्रमाणपत्र बनवून पत्नीला सरपंच करणाऱ्या भाजप आमदाराला न्यायालयाने पाठवलं तुरुंगात

बोगस प्रमाणपत्र बनवून पत्नीला सरपंच करणाऱ्या भाजप आमदाराला न्यायालयाने पाठवलं तुरुंगात
X

सरपंच पदाच्या निवडणुकीत बायको पाचवी पास असल्याचे बनावट मार्कशीट सादर करणाऱ्या भाजप आमदाराची रवानगी न्यायालयाने थेट तुरुंगात केल्याची घटना राजस्थानमध्ये समोर आली आहे. अमृतलाल मीणा असे या आमदाराचे नाव असून, उदयपुर जिल्ह्यातील साल्म्बर मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत. न्यायालयाचे आदेश आल्यानंतर ते स्वता;हून कोर्टासमोर हजर झाले आहे.

२०१५ मध्ये आमदार अमृतलाल यांच्या मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आपल्या पत्नीला सेमारी ग्रामपंचायतमधून निवडणुकीत उतरवले होते. तसेच आमदार मीणा यांनी पत्नीच्या सर्व कागदपत्रांवर पालक म्हणून स्वाक्षरी केल्या होत्या. पुढे निवणूक जिंकल्या नंतर त्यांच्या पत्नी सरपंच सुद्धा झाल्या, मात्र पराभूत उमेदवाराने मीणा यांच्या पत्नीची पाचवी पास असल्याची मार्कशीट बनावट असल्याची तक्रार केली.

पुढे सीबीसीआईडी तपासात मार्कशीट बनावट असल्याचे सिद्ध झाले. तसेच पत्नीच्या सर्व कागदपत्रांवर पालक म्हणून आमदार मीणा यांनी स्वाक्षरी केल्या होत्या, म्हणून त्यांना आरोपी करण्यात आले होते. त्यानंतर प्रकरण स्थानिक न्यायालयापासून तर सुप्रीम कोर्टापर्यंत पोहचले. पुढे सुप्रीम कोर्टाने आमदार मीणा यांना सरेंडर होण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

Updated : 14 July 2021 12:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top