माझं राजकीय जीवन संपवण्याचा भाजपचा डाव : मंत्री यशोमती ठाकूर
Admin | 17 Oct 2020 5:08 AM GMT
X
X
एकेरी मार्गावरून जाण्यास मनाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह चालक व दोन कार्यकर्त्यांना अमरावतीमधील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी (फलके) यांच्या न्यायालयाने ३ महिने सश्रम कारावास, प्रत्येकी १५ हजार ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली.
या निकाला नंतर मंत्री यशोमती ठाकूर यांनी 'एका महिलेच्या मागे आता अख्खा भाजप लागेल. त्यांना इतकंच काम आहे. भाजप सोबत माझी वैचारिक लढाई आहे आणि मला राजकीय आयुष्यातून संपवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत, पण मी माघार घेणार नाही. भाजपशी माझी लढाई सुरूच राहील.' अशी प्रतिक्रीया दिली आहे.
Updated : 2020-10-18T08:24:35+05:30
Tags: yashomati thackur
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire