Home > News > 25 वर्षीय महिलेने एकाचवेळी नऊ बाळांना दिला जन्म

25 वर्षीय महिलेने एकाचवेळी नऊ बाळांना दिला जन्म

बाळांसह आईची प्रकृती ठीक असून,यशस्वी प्रसुती केल्याबद्दल आरोग्य मंत्र्यांनी वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले आहे.

25 वर्षीय महिलेने एकाचवेळी नऊ बाळांना दिला जन्म
X

एकाचवेळी सहा बाळांना जन्म देण्याची घटना दुर्मीळ मानली जायची, मात्र दक्षिण आफ्रिकेतील माली येथील एका महिलेने एकाचवेळी नवरत्नांना जन्म दिला. हलिमा सिसाने नावाच्या 25 वर्षीय महिलेने एकाचवेळी पाच कन्या आणि चार पुत्ररत्नांना जन्म दिला आहे.

गर्भवती असताना हलिमा सिसाची तपासणी केली असता, ती सात बाळांना जन्म देईल, असे डॉक्टरांचा दावा होता. मात्र हलिमा सिसाची यांची प्रसुतीनंतर त्यांनी नऊ बाळांना जन्म दिला आहे.

नऊ बाळांसह हलिमा सिसाची यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती आरोग्यमंत्री फान्टा सिबी यांनी दिली आहे. तर हलिमाची यशस्वी प्रसुती केल्याबद्दल सिबी यांनी वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले आहे.
Updated : 6 May 2021 9:21 AM GMT
Next Story
Share it
Top