Home > News > देशाला पहिला ऑस्कर मिळऊन देण्याऱ्या वेशभुषाकार भानू अथय्या यांचं निधन

देशाला पहिला ऑस्कर मिळऊन देण्याऱ्या वेशभुषाकार भानू अथय्या यांचं निधन

देशाला पहिला ऑस्कर मिळऊन देण्याऱ्या वेशभुषाकार भानू अथय्या यांचं निधन
X

सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारवर नाव कोरणाऱ्या प्रसिद्ध कॉस्च्युम डिझायनर भानु अथैया यांचं निधन झालं आहे. त्या ९१ वर्षांच्या होत्या. ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या. त्यांच्या निधनाचं कारण अद्याप कळलेलं नाही.

भानू अथय्या या मुळच्या कोल्हापूर येथील होत्या. त्यांनी १९५६ साली सुपरहिट सिनेमा सीआयडी साठी त्यांनी वेशभूषाकार म्हणून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. रिचर्ड एटनबरो यांच्या १९८२ मध्ये आलेल्या 'गांधी' सिनेमासाठी भानू अथय्या यांचा सर्वोच्च पुरस्कार ऑस्करने सन्मानित करण्यात आले.

भानू अथय्या यांनी आमिर खानच्या 'लगान' आणि श्रीदेवीच्या 'चांदणी' सिनेमातही वेशभूषाकार म्हणून आपली प्रतिभा दाखवली होती. दरम्यान त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Updated : 16 Oct 2020 10:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top