Home > News > कोरोनाने महिला अधिकाऱ्याचा मृत्यू, ममता बॅनर्जींनी वाहिली श्रध्दांजली

कोरोनाने महिला अधिकाऱ्याचा मृत्यू, ममता बॅनर्जींनी वाहिली श्रध्दांजली

कोरोनाने महिला अधिकाऱ्याचा मृत्यू, ममता बॅनर्जींनी वाहिली श्रध्दांजली
X

कोरोना वॉरीयर म्हणून काम करणाऱ्या पश्चिम बंगालमधील महिला अधिकारी देवदत्ता रे यांच कोरोना संसर्गाने निधन झाल्याचं समोर आलं आहे. हुगली जिल्ह्यातील चंदननगर उपविभागात उपदंडाधिकारी म्हणून त्या कार्यरत होत्या. देवदत्ता रे यांच्यावर ट्रेनमधून बंगालमध्ये परतणाऱ्या परप्रांतीय मजुरांची जबाबदारी होती. बंगालमध्ये पोहोचल्यावर त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारीही त्यांच्याकडे होती.

३८ वर्षीय देवदत्ता रे यांना करोनाची लक्षणं दिसू लागल्यानंतर घरातच क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं होतं. रविवारी त्यांची प्रकृती ढासळली असता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी करोनाविरोधातील लढाईत त्यांना अपय़श आलं आणि निधन झालं. त्यांच्या मागे पती आणि चार महिन्यांचा मुलगा असा परिवार आहे.

माणुसकी आणि संवेदनशीलता दाखवत ज्या पद्धतीने त्यांनी परिस्थिती हाताळली होती त्याचं सर्वांकडून कौतुक केलं जात होतं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीदेखील देवदत्ता रे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

Updated : 15 July 2020 12:12 AM GMT
Next Story
Share it
Top