Home > News > व्हिडिओ कॉलवर तरी पाहू दे गं यशू', डॉक्टर असलेल्या लेकीला बापाचा आग्रह

व्हिडिओ कॉलवर तरी पाहू दे गं यशू', डॉक्टर असलेल्या लेकीला बापाचा आग्रह

व्हिडिओ कॉलवर तरी पाहू दे गं यशू, डॉक्टर असलेल्या लेकीला बापाचा आग्रह
X

करोना विषाणूशी रात्रंदिवस दोन हात करणारे करोना वॉरिअर्स म्हणजेच डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी इत्यादी... हे लोक देवाचं रुप घेऊन आपला जीव वाचवत आहे. परंतु रात्रंदिवस कार्यरत असणारे डॉक्टर्स कधी घरी जात असतील का? त्यांच्या कुटुंबियांशी बोलायला वेळ मिळत असेल का? असे प्रश्न तुम्हा-आम्हाला पडत जरी असले तरी काय करणार… संकटचं असं आहे की माघार घेताच येत नाही.

वाढता करोना पाहता करोना वॉरिअर्स असलेल्या डॉ. यशोदा पाटील यांनी ट्विटरवर एक ट्विट केलं आहे.

त्यात त्या म्हणतात,

काल दिवसभर बाबा "व्हिडिओ कॉलवर तरी पाहू ते गं यशू" म्हणून आग्रह धरला होता. शेवटी रात्री व्हिडिओ कॉल घेतलाच आणि काय आई-बाबांच्या गंगा-जमुना वाहायला लागल्या. खूप बिझी झालोय आम्ही, जेवायला सुद्धा वेळ मिळत नाही. आमचाही परिवार आहे म्हणून माझी सर्वांना विनंती आहे काळजी घ्या. त्यांनी आपल्या वडिलांसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असलेला फोटो पोस्ट करत #StaySafe असा हॅशटॅग वापरत सर्व नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे.

Updated : 16 April 2021 6:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top