Home > News > पालकांची चिंता मिटली, लवकरच लहान मुलांसाठी लस उपलब्ध होणार….

पालकांची चिंता मिटली, लवकरच लहान मुलांसाठी लस उपलब्ध होणार….

पालकांची चिंता मिटली, लवकरच लहान मुलांसाठी लस उपलब्ध होणार….
X

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं जगभरात अनेक देशांची चिंता वाढवली आहे. अशातच भारतात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. आजच्या घडीला देशात ओमायक्रॉनचे 45 रूग्ण आहेत. त्यामुळे कोरोना नियमावलीत बदल करण्यात आलेत. शिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. सध्या 18 वर्षाच्या पुढील प्रत्येकाला लस मिळत आहे. त्यात आता तीन महिन्याच्या पुढील मुलांनाही कोरोना लस मिळणार असल्याची माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी दिली आहे.

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आयोजीत करण्यात आलेल्या सीआयआय या शिखर परिषदेमध्ये बोलताना पुनावाला यांनी ही माहिती दिली. पुढील सहा महिन्यामध्ये तीन वर्षाच्या वरील मुलांसाठी कोरोना लस विकसीत केली जाईल असं पुनावाला यांनी सांगितले आहे.

संपूर्ण देश कोरोनाशी दोन हात करत असताना आता लहान मुलांनाही कोरोना लस उपलब्ध होणार आहे. दरम्यान, या आधी मागच्या महिन्यामध्ये भारतातील औषध नियामक प्राधिकरणाने 12 वर्ष व त्यावरील व्यक्तींच्या लसीकरणासाठी 'जाइकोव्ह-डी' लशीला मंजुरी दिली आहे. वय वर्ष 12 व त्यावरील व्यक्तीच्या वापरासाठी मंजुरी देण्यात आलेली ही पहिलीच लस आहे. केंद्र सरकारने 'जाइकोव्ह-डी' लशीचे एक कोटी डोस खरेदी करण्याचे आदेश दिलेत. एका डोसची किंमत कराशिवाय 358 रुपये आहे.

Updated : 15 Dec 2021 9:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top