Home > News > दिलासादायक : आज कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या बाधित रुग्णांपेक्षा तीन पट जास्त

दिलासादायक : आज कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या बाधित रुग्णांपेक्षा तीन पट जास्त

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी जास्त असून काल दिवसभरात 833 नवीन कोरोनाबधितांची नोंद झाली. रुग्ण संख्या कमी झाली असली तरी कोरोना नियमांचं पालन केलंच पाहिजे.

दिलासादायक : आज कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या बाधित रुग्णांपेक्षा तीन पट जास्त
X

राज्यातील (Maharashtra) कोरोना (CORONA) रुग्णांची संख्या सातत्याने कमी जास्त होत आहे. त्यामुळे आता सर्व हळूहळू पूर्वपदावर येत असून. लसीकरण देखील मोठ्या प्रमाणावर होतं आहे. लवकरात लवकर सर्वांना लसीचे ( corona vaccine) दोन्ही डोस मिळावेत यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सध्या राज्यातील कोरोणा रुग्णांची संख्या पाहिली तर काल नवीनत 833 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 2 हजार 271 बरे होऊन घरी गेले आहेत. तर काल 15 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात आजपर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या 1 लाख 40 हजार 707 इतकी झाली आहे. राज्याचा सद्याच्या मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे.

आजपर्यंत एकूण 64 लाख 74 हजार 952 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकंदरीतच सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 64 टक्के एवढे आहे.तर राज्यात एकूण ऍक्टिव्ह रुग्ण 10 हजार 249 इतके आहेत. लसीकरणाच्या वेग सुद्धा राज्यात वाढत आहे. राज्यात दुसरी लाट आता कमी होताना दिसत असून दिलासादायक बातमी अशी की दररोज कोरोनातुन मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. या सगळ्याचा विचार करता राज्यात आता सरकारकडून निर्बंध शिथिल केले जात आहेत. सध्या राज्यात शाळा, मंदिरे, चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू केलं जातं आहे. राज्यातील रुग्ण संख्या कमी झाले असले तरी कोरोना नियमांचं पालन केलंच पाहिजे

Updated : 21 Nov 2021 2:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top