धक्कादायक : कोरोना पॉझिटिव्ह असुनही महिलेने केला पुणे ते दुबई विमानप्रवास!
Max Woman | 21 July 2020 10:02 AM IST
X
X
पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधित महिला पुण्यातून विमानाने दुबईला गेल्याने शहरात महापालिकेचा भोंगळ कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. संबंधित महिलेने 11 जुलैला आदित्य बिर्ला रुग्णालयात कोविड 19 चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचा अहवाल 12 जुलैला पॉझिटिव्ह आला. पण कोरोनाची सौम्य लक्षणं असल्याने डॉक्टरांनी महिलेला होम क्वारंटाइन होण्यास सांगितले होते.
दरम्यान ही महिला शुक्रवारपर्यंत सहा दिवस घरात क्वारंटाइन होती. मात्र, त्यानंतर ती दुबईत राहत असलेल्या पतिकडे विमानाने गेली. सोसायटीधारकांनी यावर प्रश्न निर्माण करत, ही महिला खोट बोलून विमान प्रवास करून दुबईला गेल्याचे पोलिसांना पत्र देत म्हटले आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी अधिक तपास करत आहेत.
Updated : 21 July 2020 10:02 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire