Home > News > देशात करोनाचा उद्रेक

देशात करोनाचा उद्रेक

देशात करोनाचा उद्रेक
X

आज देशातील वाढत्या कोरोना रुग्णांची परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने आता 18 वर्षापुढील सर्वांना लसीची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. देशात आज सोमवारी 2 लाख 73 हजार 810 नवीन कोरोनाचे रुग्ण समोर आले आहेत. यामध्ये 1 हजार 619 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 1 लाख 44 हजार 178 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.

सध्या देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 50 लाख 61 हजार 919 वर गेली आहे. देशात सध्या Active रुग्णांची संख्या 19 लाख 29 हजार 329 इतकी आहे.

Updated : 21 April 2021 4:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top