Latest News
Home > News > देशात दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्या घटली...

देशात दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्या घटली...

देशात दुसऱ्या दिवशी कोरोना  रुग्णसंख्या घटली...
X

गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट होत असल्याची दिलासादायक बाब आहे. तर कोरोनामुक्तीचा दरही वाढला आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने देशाचे टेन्शन वाढवले होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. तर गेल्या 24 तासात देशात 2 लाख 38 हजार 18 रुग्ण आढळून आले आहेत. याबरोबरच देशात गेल्या 24 तासात 1 लाख 57 हजार 421 रुग्ण बरे झाले आहेत.

देशात कोरोना रुग्णसंख्येत सलग दुसऱ्या दिवशी घट झाल्याची दिलासादायक बाब आहे. तर कोरोना रुग्णांच्या मृत्यूसंख्येतही घट झाली आहे. गेल्या 24 तासात 310 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात 4 लाख 86 हजार 761 इतक्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात 17 लाख 36 हजार 628 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे देशात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात देशात 1 लाख 57 हजार 421 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण कोरोनामुक्त रूग्णांची संख्या 3 कोटी 53 लाख 94 हजार 882 वर पोहचली आहे. यासह देशात लसीचे 158 कोटी 4 लाख 47 हजार 770 लसीचे डोस देण्यात आले आहेत.

देशात ओमायक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये वाढ कायम आहे. तर आतापर्यंत ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटचे 8 हजार 891 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

भारतात गेल्या 24 तासात 16 लाख 49 हजार 143 कोरोना चाचणी करण्यात आल्या. तर आतापर्यंत 70 कोटी 54 लाख 11 हजार 425 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती ICMR ने दिली. तर 12 ते 14 वर्षाच्या बालकांच्या लसीकरणावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोणताही निर्णय झाला नसल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

महाराष्ट्रातील रुग्णसंख्या-

गेल्या काही दिवसात राज्यातील रुग्णसंख्येतही कमालीची घट होताना दिसत आहे. तर गेल्या 24 तासात 31 हजार 111 नवे रुग्ण आढळून आले. तर 29 हजार 92 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात 122 ओमायक्रॉन रुग्णांची वाढ झाली. यासह राज्यात ओमायक्रॉन रुग्णसंख्या 1 हजार 860 इतकी झाली आहे. तर राज्याचा कोरोनामुक्तीचा दर 94.3 टक्के इतका आहे.

Updated : 18 Jan 2022 4:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top