Latest News
Home > News > सोनिया गांधी आणि राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर !

सोनिया गांधी आणि राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर !

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्वच पक्षाचे नेते तयारी लागले आहेत. असातच आता काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी मुंबई दौरा करणार आहेत

सोनिया गांधी आणि राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर !
X

मुंबई// राज्यातील आगामी महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर सर्वच पक्ष कंबर कसताना दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तर अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभुमीवर भाजप पाठोपाठ आता काँग्रेसने देखील तयारी सुरु केलेली पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची मुंबईतील शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे.

महापालिका निवडणुकीच्या आधी काँग्रेसकडून मुंबईमध्ये मोठा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्याला सोनिया गांधी आणि राहुल गांधींसह काँग्रेसचे दिग्गज नेते देखील उपस्थितीत राहणार आहे. २८ डिसेंबर ला शिवाजी पार्कवर हा मेळावा होणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. त्याच दिवशी काँग्रेसचा स्थापना दिन देखील आहे.

तर दुसरीकडे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपच्या देखील हालचाली वाढल्यात. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. वास्तविक पाहाता मनसे – भाजप यांच्या युतीचा कोणताही प्रस्ताव सध्या नसल्याचे पाटील यांनी सांगितले मात्र, पाटील-ठाकरे भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलं आहे.

Updated : 7 Aug 2021 1:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top