Home > News > महागाईच्या मुद्द्यावरुन यशोमती ठाकूर यांचे खोचक शब्दातील ट्विट..

महागाईच्या मुद्द्यावरुन यशोमती ठाकूर यांचे खोचक शब्दातील ट्विट..

महागाईच्या मुद्द्यावरुन यशोमती ठाकूर यांचे खोचक शब्दातील ट्विट..
X

शातील वाढत्या महागाईवरुन विरोधकांनी सरकारला सातत्याने लक्ष्य केले आहे. संसदेमध्येही महागाईच्या मुद्द्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. काँग्रेसच्या आमदार आणि माजी महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर महागाईच्या मुद्द्यावरुन जोरदार टीका केली आहे. त्यांनी केलेले ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

देशातील एकूणच परिस्थिती पाहाता वाढत्या महागाई आणि मंदी विरोधात अतिशय खोचक शब्दातील ट्विट करीत त्यांनी मोदी सरकाराला सामान्यांच्या प्रश्नांबाबत जाब विचारला आहे.

"रुपया पोहचवलाय 80 पार... गॅसवाला मागतो रुपये हजार... जूनमध्ये झाले 1.3 कोटी बेरोजगार... आता अन्नधान्यावरही GSTचा भार... मंदी-महागाईने सामान्य झालाय बेजार.. गरीबानं कसं जगायचं, सांगाल का #मोदीसरकार ?" असे सूचक ट्विट करीत सर्वसामान्यांच्या भावनांना वाट मोकळी करून देतानाच त्यांनी वाढत्या महागाई (Inflation)वर केंद्रातील मोदी सरकारला प्रश्न विचारला आहे.

देशाचे चलन असलेल्या रूपयाचे अवमूल्यन झाले आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत ऐतिहासिक ८० रुपयाचा नीचांकी स्तरावर आला आहे. देशातील स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर एक हजार पन्नास रुपयांपर्यंत महागला आहे. त्यातच गेल्या महिन्यात तब्बल १.३ कोटी लोक बेरोजगार झाले आहेत. एकीकडे खाण्या-पिण्याचे वांदे झाले असताना आता अन्नधान्यवर जीएसटी वाढवून मोदी सरकारने सर्व सामान्यांना बेजार करून सोडले आहे, अशा स्वरुपाची टीका ठाकूर यांनी केली आहे.

देशात पेट्रोल डिझेल, गॅस सिलेंडरसह अगदी जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी भाववाढीने त्रस्त गरीबाने जगायचं तरी कसं असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबद्दल आवाज उठवायचा तर मोदीसरकारने आंदोलन, उपोषणास बंदी घातली आहे, शब्दबंदीकरूनही संसदेतील सर्व सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यावरही मर्यादा आणलेल्या आहेत. मंदी आणि महागाई वर मोदी सरकार आणि त्यांचे मंत्री यावर काहीही न बोलताना दिसत नाही. महत्वाचे मुद्दे आणि सामान्यांचे रोजचे जगणे अवलंबून असलेल्या गोष्टींना बगल देत धर्म आणि मंदिरांचे राजकारण केले जात आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. मंदी आणि महागाईमुळे देशातील गरीब अजून गरीब होत आहे, गरीबानं कसं जगायचं, सांगाल का #मोदीसरकार ? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

Updated : 19 July 2022 1:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top