Home > News > महागाई वाढली! मग प्रश्न का विचारू नये...? नेट्टा डिसुझा यांचा सवाल!

महागाई वाढली! मग प्रश्न का विचारू नये...? नेट्टा डिसुझा यांचा सवाल!

महागाई वाढली! मग प्रश्न का विचारू नये...?  नेट्टा डिसुझा यांचा सवाल!
X

काही दिवसांपुर्वी काँग्रेसच्य राष्ट्रीय महिला अध्यक्षा नेट्टा डिसुजा यांनी विमानात प्रवास करत असताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना महागाइवर प्रश्न विचारले होते. त्यांनी याचा व्हिडीओदेखील समाजमाध्यमांवर अपलोड केला होता आणि तो व्हायरलही झाला होता. आता नेट्टा डिसुझा यांनी ट्विटरवर एक पोस्ट टाकली आहे. यात त्यांनी एक फोटो टाकला असुन त्यात महागाई वाढली मग प्रश्न का विचारू नये अस सवालच विचारला आहे.

नेट्टा डिसुजा यांना या फोटोत, "बिघडलेलं गणित या आशयाखाली मार्चमध्ये ६.९५ टक्क्यांनी महागाई वाढली. सलग तिसऱ्या महिन्यात ६ टक्क्यांनी महागाईत वाढ झाली. खाण्यापिण्याच्या गोष्टी महागल्याने गेल्या सतरा महिन्यात महागाई सर्वाधिक!", असं म्हटलं आहे. त्यांच्या या ट्विटवर प्रतिक्रीयांचा पाऊस पडला आहे.

यावर दिलशाद खान या वापरकर्त्याने, "महागाई,बेरोजगारी यावर केंद्र सरकार पूर्णपणे गप्प आहे.जनतेला महागाईची खूप चिंता आहे.त्यांनी पुढे येऊन जनतेशी बोलले पाहिजे.आणि महागाई कमी झाली पाहिजे.लबाड आणि द्वेषाने देश सुखी होऊ शकत नाही." असं म्हटलं आहे.

तर ससिकांत सिंह यांनी एक ग्राफिक्स पोस्ट टाकून काही तथ्य मांडली आहेत. त्यात ते म्हणतायत, " मोदी आहेत तर शक्य आहे. १. भारतात LPG च्या किंमती जगात सर्वाधिक २. पेट्रोलच्या किमतीत भारत जगात तिसरा ३. सामान्य भारतीयाचा एक चतुर्थांश पगार हा एक लीटर पेट्रोल विकत घेण्यामध्ये जातो. ४. डिझेलच्या किंमतीत भारत जगात आठवा"

शिवाय रविंद्र नाथ मिश्रा नामक एका वापरकर्त्याने, "जिथे काँग्रेसची सत्ता आहे तिथेही जाऊन विचारा हे प्रश्न" अशी प्रतिक्रीया दिली आहे.

तर रहिम खान या वापरकर्त्याने एका वृत्पत्राचे कात्रणच लावलं आहे ज्यात महागाईची बातमी छापली आहे.

नेत्यांचं राजकारण तर चालतच राहिल पण सध्याच्या काळाच देशात महागाई वाढली आहे यात काही दुमत नाही.

Updated : 13 April 2022 8:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top