Home > News > काँग्रेसतर्फे राज्यसभेसाठी संध्याताई सव्वालाखे यांच्या नावाची चर्चा…

काँग्रेसतर्फे राज्यसभेसाठी संध्याताई सव्वालाखे यांच्या नावाची चर्चा…

काँग्रेसतर्फे राज्यसभेसाठी संध्याताई सव्वालाखे यांच्या नावाची चर्चा…
X

गेल्या महिन्यात राज्यसभेच्या खासदारांचा कार्यकाळ संपला आणि आता अनेक जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे आता राज्यातून राज्यसभेच्या सहा रिक्त जागा भरल्या जाणं अपेक्षित आहे. यामध्ये काँग्रेसकडून राज्य महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे.

आता राज्यातून राज्यसभेच्या सहा रिक्त जागा भरल्या जाणं अपेक्षित आहे. भाजपमधून २, तर इतर पक्षांकडून प्रत्येकी १ खासदार राज्यसभेवर पाठवले जाणार आहेत. यामध्ये प्रत्येक पक्ष आता आपापल्या नावाची चर्चा करू लागला आहे. शिवाय उर्वरीत सहाव्या जागेवर छत्रपती संभाजीराजे यांनी स्वतःचं नाव पुढे करत सर्वपक्षीयांना आपल्या पारड्यात मत टाकण्याचं आवाहन केलं आहे. शिवसेनेकडून त्यांना त्यासाठी पक्षप्रवेशाची ऑफर देखील देण्यात आली आहे. राष्ट्रवादी आणि भाजपक़डूनही त्यांच्या नावांची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. अशात आता काँग्रेसकडून संध्या सव्वालाखे यांच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे.

याबद्दल आम्ही संध्या सव्वालाखे यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी त्या म्हणाल्या की, "मला अजुन पक्षश्रेष्ठींकडून तसा काही फोन किंवा कोणत्याही प्रकारचा संदेश मिळालेला नाही. पण राहुल गांधी किंवा पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी असतील, ते कायम महिलांना प्राधान्य देत असतात. आता त्यांच्या मनात कुणाचं नाव सुरू आहे याबद्द्ल मला काहीही ठाऊक नाही. मला सुद्धा टीव्हीवरच ही बातमी कळाल्याचं त्यांनी सांगितलं"

Updated : 22 May 2022 10:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top