Home > News > कॉन्डोम कंपनीच्या आलीया व रणबीरला अनोख्या शुभेच्छा..

कॉन्डोम कंपनीच्या आलीया व रणबीरला अनोख्या शुभेच्छा..

कॉन्डोम कंपनीच्या आलीया व रणबीरला अनोख्या शुभेच्छा..
X

मागच्या दोन महिन्यांपूर्वी अभिनेत्री आलिया भट्ट (Alia bhatt) आणि अभिनेता रणवीर कपूर (Ranbir Kapur) यांचा विवाह झाला. त्यांच्या या विवाहाची चर्चा भारतातच नाही तर जगभर झाली. बॉलीवूड इंडस्ट्रीतील चॉकलेट बॉय अशी ओळख असलेल्या रणबिर कपूर यांचा आलीय भट्ट यंच्याशी झालेल्या विवाहाच्या चर्चेनंतर आता आलिया भट्ट यांनी एक गुड न्यूज दिली आहे. आलिया भट्ट यांनी नुकतेच त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून त्या लवकरच आई बनणार असल्याची माहिती दिली आहे. ही गुड न्यूज मिळतात सध्या समाज माध्यमांवर या दोघांवर शुभेच्छांचा वर्ष होत आहे. पण या शुभेच्छांमध्ये ड्यूरेक्स (Dure) या कोंडोम कंपनीने त्यांना दिलेल्या शुभेच्छांची सध्या जोरात चर्चा आहे. एकदम अनोख्या पद्धतीने त्यांनी या दोघांना शुभेच्छा दिली आहे. रणवीर कपूर यांच्याच 'ये दिल हे मुश्किल' या चित्रपटातील चंदा मेरेया' या गाण्याची ओळ घेऊन 'मैफिल मे तेरे हम तो क्लियरली नही थे अभिनंदन" असं म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.
सध्या राज्यात एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाच्या विरोधात केलेल्या बंडाची मोठी चर्चा आहे. शिंदे यांच्या याच बंडामुळे सध्या राज्यातील सरकार देखील कोसळले आहे.एकीकडे राज्यात या महत्त्वाच्या घडामोडी घडत असल्या तरी सध्या चर्चा मात्र बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिचीच आहे. आज आपण जर पाहिलं तर मागच्या काही दिवसांपासून आलिया भट्ट गुगल ट्रेनमध्ये नंबर एक एकवरती आहे.

आलिया भट्ट यांनी नुकतच तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून ती आई बनणार असल्याची बातमी दिली आहे.(Alia bhatta is pregnent) आलियाने हॉस्पिटल मधील रणबीर कपूर सोबतचे फोटो शेअर करत ''माझे बाळ लवकर येत आहे" असं कॅपशन दिलं आहे.

आलिया भट्ट आणि रणवीर कपूर यांनी दिलेल्या या गोड बातमी नंतर कॉन्डोम कंपनी Durex यांनी सुद्धा त्यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.

Updated : 29 Jun 2022 8:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top