नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सरकारी तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) LPG गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. आज शुक्रवारी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 250 रुपयांनी वाढ झाली आहे. या 19 किलोग्रॅम सिलेंडरची किंमत आता 2 हजार 553 रुपये होणार आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.
22 मार्च रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती, तर व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर स्वस्त झाला होता. दिल्लीत घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 949.50 रुपये आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने त्याचा परिणाम हॉटेल्स आणि रेस्टॉरंटवर दिसून येणार आहे. याचा परिणाम सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावरही होणार आहे, कारण खर्च वाढल्याने बाहेरील खाद्यपदार्थांच्या किमती वाढणे साहजिक आहे.
Updated : 2022-04-01T08:41:08+05:30
Next Story