Home > News > Comedian Raju Srivastava : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक..

Comedian Raju Srivastava : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक..

Comedian Raju Srivastava : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक..
X

लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराच्या झटक्याने दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. जिथे त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, राजू यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

ट्रेडमिलवर धावताना छातीत दुखू लागलं..

राजूचे जवळचे सहकारी मकबूल निसार यांनी सांगितले की, 59 वर्षीय राजू श्रीवास्तव हॉटेलच्या जिममध्ये सकाळी वर्कआउट करत होते. यादरम्यान ट्रेडमिलवर धावत असताना त्यांना छातीत दुखू लागले आणि ते खाली पडले. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते म्हणाले की, राजू श्रीवास्तव पक्षातील काही बड्या नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत पोहोचले होते. राजू यांनी २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.

राजू हे उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्ष आहेत..

राजू श्रीवास्तव हे त्यांच्या दमदार कॉमेडीसाठी ओळखले जातात. त्याने अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्येही काम केले आहे. वर्षानुवर्षे राजू आपल्या कॉमेडीने लोकांच्या मनावर राज्य करत आले आहेत. ते उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्षही आहेत. राजूला लहानपणापासूनच कॉमेडियन व्हायचं होतं आणि त्याचं स्वप्नही त्याने पूर्ण केलं.

Updated : 11 Aug 2022 3:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top