Home > News > सर्वसामान्य लोकांनी नितीन गडकरी व आदित्य ठाकरेंचे काढले वाभाडे..

सर्वसामान्य लोकांनी नितीन गडकरी व आदित्य ठाकरेंचे काढले वाभाडे..

सामाजिक कार्यकर्त्या मेधा कुलकर्णी यांनी महामार्गांवर स्वछतागृहे नसल्याची एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर अनेकांनी महामार्गांची दुरवस्था व स्वछतागृहावरून संताप व्यक्त केला आहे.

सर्वसामान्य लोकांनी नितीन गडकरी व आदित्य ठाकरेंचे काढले वाभाडे..
X

आपण सर्वजण म्हणतो की महाराष्ट्र प्रगतशील आहे. असं जरी आपण अगदी गर्वाने सर्वांना सांगत असलो तरी देखील आजही महाराष्ट्रातील अनेक गावं अंधारमय आहेत, अनेक ठिकाणी लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी मरमर करावी लागते आहे. अनेक वाड्या-वस्त्यांवर साध्या मूलभूत सुविधा सुद्धा अजून पोहोचलेल्या नाहीत.

या समस्या तर आहेतच पण आणखीन एक सर्वात महत्त्वाची समस्या आहे ती, म्हणजे प्रवास करत असताना रस्त्यांच्या बाजूला नसणाऱ्या स्वच्छतागृहांची. महामार्गांवर प्रवास करत असताना स्वच्छतागृहांची आवश्यकता आहे. मात्र वास्तव काय आहे हे तुम्ही प्रवास करत असताना अनुभवलंच असेल.

याच गोष्टीचा अनुभव सामाजिक कार्यकर्त्या मेधा कुलकर्णी यांना सुद्धा आला आहे. या संदर्भातील एक पोस्ट त्यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. त्यामध्ये त्या म्हणतात की, "नुकतंच कामासाठी पाच दिवस खानदेशात फिरले. आता मराठवाड्यात निघालेय. प्रवासात नेहमीच वॉशरूम मिळण्याचा ताण. ती पाणी आणि कडी नीट असलेली हवी. पेट्रोल पंप, ढाबे इथेही धड सोय नसते. किती वेळा पुन्हा पुन्हा हे सांगत राहायचं?" असं म्हणत त्यांनी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितिन गडकरी व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना याकडे लक्ष द्या अशी विनंती केली आहे.

खरंतर त्यांनी जे मांडले आहे ते प्रगतशील महाराष्ट्राचं धडधडीत वास्तव आहे. रस्त्याच्या कडेला स्वच्छ व सुअवस्थेतील स्वछतागृहे नसल्यामुळे प्रवास करत असताना महिलांना वारंवार या गोष्टीचा त्रास सहन करावा लागतो. रस्त्यामध्ये एखादे स्वछतागृह असेलच तर ते नीट अवस्थेत नसतं किंवा त्यामध्ये कधी तुम्हाला पाण्याची टंचाई दिसेल तर कधी त्याची इतकी दुरावस्था झालेली असेल की, त्याला ना नीट कडी असते ना ते नीट वापरण्याच्या अवस्थेत.

या महत्त्वाच्या गोष्टी आहेत मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष का केले जात असेल? रस्त्याच्या कडेला साधे एक स्वच्छतागृह बनवले जात नाही. बनवलंच तर त्याची काही दिवसातच अशी दुरावस्था होते की त्याचा उपयोग फक्त भटक्या जनावरांच्या वास्तव्यासाठी होतो.

आता मेधा कुलकर्णी यांनी जी पोस्ट शेअर केली आहे त्यावरती अनेक संतप्त अशा प्रतिक्रिया देखील आल्या आहेत. त्या प्रतिक्रिया काय आहेत त्या देखील पाहूयात…

आशिष मेटे या ट्विटर वापरकर्त्याने मेधा कुलकर्णी यांच्या ट्विटला रिट्विट करत म्हटले आहे की, "एक विनंती आहे जळगाव औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास जमले तर टाळा कारण नॅशनल हायवे च्या कृपेने 2016 पासून या महामार्गाचे काम काही केल्या पूर्ण काही होत नाही."

अशोक कोठेकर म्हणत आहेत की, "तुमचे मुद्दे अगदी बरोबर आहेत, मात्र तुम्ही ज्या अपेक्षा प्रवासात असताना करताय त्याच गोष्टी तुम्ही ज्या मराठवाड्याला भेट देताय तेथील ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या घरात मिळत नाहीत त्यासाठी सुद्धा तुम्ही आवाज उठवला तर आम्ही तुमचे आभारी राहू"

अशोक कोठेकर जे म्हणताय ते वास्तव आहे. आजही खेडेगावातील अनेक महिलांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे. त्यातील सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे स्वच्छतागृहांची आजही अनेक घरांमध्ये स्वच्छतागृहे नाहीत लोकांना आज देखील उघड्यावर शौचास जावे लागते.

विरेन यादव यांनी कमेंट करत म्हटले आहे की "एचपीसीएल/बीपीसीएल/शेल या बहुतांश इंधन पंपांमध्ये महामार्गावरील स्वच्छतागृहे चांगली आहेत."

गणेश गजमल पाटील यांनीदेखील राष्ट्रीय महामार्गाच्या ट्विटर हँडलला टॅग करत एक विनंती केली आहे. ते म्हणतात, "एक विनंती आहे नांदेड जालना व्हाया परभणी राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास जमले तर टाळा कारण @NHAI_Official च्या कृपेने व स्थानिक नेत्यांचा कृपेने ह्या महामार्गाचे काम काही केल्या पुर्ण काही होत नाही."

सीमा प्रभावलकर यांनी म्हटले आहे की, एक्सप्रेस हायवे वर येणारे ट्रॅक, ट्रॅक्टर मुळे अपघातात प्रचंड वाढ होत आहे. ट्रकसारख्या जड वाहणासाठी वेगळा मार्ग असल्यास अपघात टाळण्यासाठी मदत होईल. कृपया अपघात टाळण्यासाठी जास्तीतजास्त प्रयत्न व्हावेत. धन्यवाद

सीमा यांनी जी कमेंट केली आहे त्याच कमेंटला उत्तर देत विनायक मुंबई या ट्विटर वापरकर्त्यांना म्हटले आहे की, "गडकरी आता छोट्या खाजगी गाड्या आकाशातून चालवायचे तंत्र विकसित करतायत. मग ट्रक रोड वरून आणि खाजगी गाड्या हवेतून. नो अपघात . नो फिकीर

प्रभाकर तिल्लू यांनी देखील मेधा कुलकर्णी यांच्या ट्विट वर कॉमेंट करत म्हंटलं आहे की, ''एक वेळ दारूचे दुकान मिळेल बिअर बार मिळतील पण स्वच्छ सार्वजनिक टॉयलेट मिळणे अशक्य आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर हीच स्थिती आहे . विशेषतः भगिनी वर्गास फार त्रासाचे आहे. 75 वर्ष स्वातंत्र्याची पण सार्वजनिक स्वछतागृहे नाहीत''

याच त्यांच्या ट्विटला रिट्विट करत Rajesh 🚩हिंदू तितुका मेळवावा राष्ट्रधर्म वाढवावा हे Twitter User म्हणतायत की, टॉयलेट या विषयाचे महत्व कळायला ही स्वातंत्र्यानंतर 67 वर्षे जायला लागली ही शोकांतिका

आता महामार्गावर प्रवास करत असताना येणाऱ्या अडचणींचा नागरिकांनी मेधा कुलकर्णी यांच्या पोस्टवरील कॉमेंटबॉक्स मध्ये पाढाच वाचला आहे. अनेकांनी त्यांना आलेले अनुभव, स्वच्छतागृह नसल्यामुळे होत असलेल्या अडचणी, रस्त्यांची दुरावस्था या विषयी नाराजी व्यक्त केली आहे.

तुम्ही ज्या भागात राहतात त्या भागात रस्त्यांची काय अवस्था आहे तिथे असलेल्या महामार्गांवर स्वच्छतागृहे आहेत का? हे देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा.

Updated : 19 April 2022 4:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top