Home > News > ''देवेंद्रजींनी थोडं प्रेम, दया, करुणा दाखवली..'' मुख्यमंत्र्यांचा धनंजय मुंडेंना टोमणा

''देवेंद्रजींनी थोडं प्रेम, दया, करुणा दाखवली..'' मुख्यमंत्र्यांचा धनंजय मुंडेंना टोमणा

देवेंद्रजींनी थोडं प्रेम, दया, करुणा दाखवली.. मुख्यमंत्र्यांचा धनंजय मुंडेंना टोमणा
X

'तुमचाही इतिहास मला माहित आहे, त्यावेळी देखील आपल्या देवेंद्रजींनी थोडं प्रेम, दया, करुणा दाखवली' असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनंजय मुंडेंना भर सभागृहात टोमणा लगावला. करून मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचा दावा केला आहे. धनंजय मुंडे यांच्यासोबत लग्न झालं असून त्यांनी माझी फसवणूक केली असल्याचं त्या वारंवार सांगत आहेत. आता राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर काल करून मुंडे यांनी विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली. हे सगळं होत असताना काल सभागृहात मुख्यमंत्र्यांनी करून मुंडे यांच्यावरून धनंजय मुंडे यांना टोला लगावला.

आपण पाहतो आहोत की अगदी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून माजी मंत्री धनंजय मुंडे हे सभागृहात असेल किंवा सभागृहाच्या बाहेर चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.. यावरूनच मुख्यमंत्री शिंदे यांनी काल सभागृहात बोलतं असताना धनंजय मुंडे यांना ''तुम्ही बेंबीच्या देठापासून ओरडून, तुमचा घसा खराब होईपर्यंत तुम्ही बोललात, आता तुमचा पण सगळा प्रवास मला माहिती आहे, त्यावेळी देखील आपल्या देवेंद्रजींनी थोडं प्रेम, दया, करुणा दाखवली, दाखवली ना? त्यामुळे थोडं...'' असं म्हणत टोला लगावला.. आता शिंदे यांनी असं म्हंटल्यानंतर सभागृहातील सर्वांचे चेहरे अगदी गंभीर झाल्याचं पाहायला मिळालं.. विशेष म्हणजे करून मुंडे यांनी देखील काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली...

Updated : 23 Aug 2022 4:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top