Home > News > चित्रा वाघ याचं 'tweet' त्याला चाकणकरांचा 'retweet'

चित्रा वाघ याचं 'tweet' त्याला चाकणकरांचा 'retweet'

चित्रा वाघ याचं tweet त्याला चाकणकरांचा retweet
X

भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) आणि प्रवीण दरेकर (praveen darekar) यांनी सातारा (satara flood)जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागांची पाहणी करत असताना पूरग्रस्तांसोबत बसून जेवण घेतलं. त्यांनतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत फडणवीस आणि दरेकर याचं कौतुक केलं होते. त्यांच्या याच कौतुकावरून राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्या सातारा दौऱ्यातील पूरग्रस्तांसोबत बसून जेवणाचे फोटो ट्वीट करत चित्रा वाघ म्हणाल्या होत्या की, "एकीकडे महापुरात उध्वस्त झालेल्या कुटूंबांची जाहिर मुस्कटदाबी अन् दुसरीकडे मांडीला मांडी लावून दोन घास घेत सावरण्यासाठीचं बळ आणि सोबत असल्याचा विश्वास… खरच चित्रं खुप बोलकी असतात..!!" असा टोला ठाकरे सरकारला चित्रा वाघ यांनी लगावला होता.

चित्रा वाघ यांच्या ट्वीटनंतर त्यांना उत्तर देत रुपाली चाकणकर यांनी सुद्धा ट्वीट केलं आहे. २०१९ च्या पुराची आठवण करून देत चाकणकर म्हणाल्यात की, "चित्र खरीच खुप बोलकी असतात, २०१९ ला हवेतून पाहणी करणारे आज सरळ जमिनीवर येऊन बसले...... #येपब्लिकहैयेसबजानतीहै, असा खोचक टोला चाकणकर यांनी लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्या सातारा दौऱ्यातील पूरग्रस्तांसोबत बसून जेवणाचे फोटो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तर यावरून विरोधक भाजपला ट्रोल सुद्धा करताना पाहायला मिळत आहे, तर भाजप नेत्यांकडून कौतुक होत आहे.

Updated : 29 July 2021 6:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top