Home > News > 'धर्मवीर जय महाराष्ट्र' भाजप नेत्याच्या या ट्विट चा अर्थ काय?

'धर्मवीर जय महाराष्ट्र' भाजप नेत्याच्या या ट्विट चा अर्थ काय?

धर्मवीर जय महाराष्ट्र भाजप नेत्याच्या या ट्विट चा अर्थ काय?
X

शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री एकानाथ शिंदे नाराज असल्याचे वृत्ताने खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्रीपासून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे ११ आमदार नॉटरिचेबल असल्याचे वृत्त येत आहे त्यामुळे शिवसेनेची चिंता वाढली आहे. एकनाथ शिंदे भाजपच्या संपर्कात असल्याचे सुद्धा म्हंटले जात आहे या सगळ्यावर भापच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत धर्मवीर जय महाराष्ट्र असं ट्विट केलं आहे.

एकनाथ शिंदे हे सुरतमधील एका हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याचे म्हंटले जात आहे त्या ठिकाणी गुजरात पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त लावला आहे. दरम्यान भाजपच्या गुजरातमधील काही नेत्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. एकनाथ शिंदे नॉटरीचेबल असलेल्या बतमीनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एक ट्विट केलं आहे त्यांनी म्हंटल आहे की, धर्मवीर जय महाराष्ट्र

काल संध्याकाळपासून एकनाथ शिंदे नॉटरीचेबल असल्याच्या बातम्या येत आहेत. ते व त्यांच्या संपर्कातील काही आमदार अहमदाबादच्या दिशेने रवाना झाल्याची वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे ११ आमदार हॉटेलमध्ये आहेत, असेही समजते आहे.

Updated : 21 Jun 2022 6:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top