Latest News
Home > News > मोदींच्या सुरक्षेवर बोलणाऱ्या राऊतांनी आपले ज्ञान राज्य पातळीवर उपयोगात आणावे: चित्रा वाघ

मोदींच्या सुरक्षेवर बोलणाऱ्या राऊतांनी आपले ज्ञान राज्य पातळीवर उपयोगात आणावे: चित्रा वाघ

मोदींच्या सुरक्षेवर बोलणाऱ्या राऊतांनी आपले ज्ञान राज्य पातळीवर उपयोगात आणावे: चित्रा वाघ
X

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या मुद्यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनातून जोरदार टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उत्तर दिले आहे. तर राऊत यांनी आपले ज्ञान राज्य पातळीवर उपयोगात आणावे, असा टोलाही चित्रा वाघ यांनी लगावला आहे.

चित्रा वाघ यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, "सर्वोच्च ज्ञानी व सोनिया सेनेचे प्रवक्ते संजय राऊत ह्यांनी आपल्या प्रात:कालीन सवयीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देशातील तमाम बड्या नेत्यांना देण्यात आलेली सुरक्षा अनाठायी आहे असा जावईशोध लावला आहे.

अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर अत्यंत परखड भूमिका मोदीजी घेत असतात अशावेळी त्यांची सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असते, हे आपल्याला कसे समजेल कारण हा विषय खूप मोठा आहे हे मला सांगतां येणार नाही, असं वाघ म्हणाल्यात.
संजय राऊत यांनी सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यक्रमात सुरक्षेच्या नावाने अतिरेक सुरु असल्याची टीका केली होती. यावेळी त्यांनी मोदींच्या वाराणसी येथील सभा आणि अमित शहा यांच्या अहमदाबाद दौऱ्यावरून सुद्धा टीका केली आहे.

Updated : 18 July 2021 6:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top