Home > News > ''सुनेला छळणारी सासू'' ते '' इथपर्यंत पोहोचण्यासाठी कोणा कोणाशी संधान साधलं''

''सुनेला छळणारी सासू'' ते '' इथपर्यंत पोहोचण्यासाठी कोणा कोणाशी संधान साधलं''

भाजप व राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांमध्ये रंगले ट्विटर वॉर..

सुनेला छळणारी सासू ते  इथपर्यंत पोहोचण्यासाठी कोणा कोणाशी संधान साधलं
X

समाजमाध्यमांवर आता एक नवा ट्रेंड आला आहे. काय आहे हा ट्रेंड तर यामध्ये एकमेकांवर जोरदार तुटून पडने. याने त्याला काय तर म्हणायचं मग त्याने त्याला काय तर उत्तर द्यायचं..थोडक्यात जशी आपल्याकडे नळावर बायकांची भांडणे होतात ना अगदी तसेच. पण या भांडणांना एक गोड नावं दिल आहे ते म्हणजे सोशल मीडिया वॉर. आता असाच एक वॉर भाजप व राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांमध्ये चालू आहे. तर काय आहे हा वाद? आणि नक्की कोण कोणाला काय काय म्हंटल आहे पाहुयात..

तर मागच्या दोन दिवसांपासून भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ व राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांच्यात जोरदार जुंपली आहे. सुनेला छळणाऱ्या सासूच्या प्रसिद्धीसमोर बाकी सगळं फिकचं नाही का? पुन्हा नादी लागू नका माझ्या, तोंडावर आपटाल अशा शब्दात चित्रा वाघ यांनी विद्या चव्हाण यांना धमकावलं आहे. आता याला चव्हाण यांनी देखील अशाच शब्दात उत्तर दिले आहे. या दोघांच्यात हे ट्विटर वॉर आज काही पहिल्यांदा होत नाहीये. यापूर्वी देखील या दोघी एकमेकांना ट्विटर वर अशा प्रकारे भिडल्या आहेत. या दोघांच्यात सुरु असलेले ट्विटर वॉर नक्की काय आहे सविस्तर पाहू..

विद्या चव्हाण काय म्हणाल्या..

चित्रा वाघ यांनी दोन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडीओ मध्ये एका हॉटेलमध्ये एका व्यक्ती सोबत एक महिला दिसत आहेत ती महिला त्या व्यक्तीच्या खांद्यावर डोके ठेऊन बसली आहे असा हा व्हिडीओ आहे. या व्हिडिओत असणारी व्यक्ती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले असल्याचं म्हंटल जात आहे. त्यानंतर महाविकास आघाडीतील सर्वच महिला आक्रमक झाल्या चित्रा वाघ यांच्यावर सर्वजण कोणतीही खातरजमा न करता व्हिडिओ शेअर केला म्हणून तुटून पडल्या. यामध्ये विद्या चव्हाण यांनी देखील वाघ यांना संजय राठोड, मेहबूब शेख, नाना पाटोले...! अनेकां विषयी उजळ माथ्याने पत्रकार परिषद कोणत्या तोंडाने घेता...? तुमच्यावरती तर अनेक पत्रकार परिषदा घेता येतील...! एवढी माहिती आमच्याकडे आहे...! याचे भान ठेवा...! पण स्वः प्रसिद्धीसाठी इतक्या खालच्या पातळीवर जातांना आमच्या सगळ्यांच्या नैतिकतेवर व आम्ही इतकी खालची पातळी गाठू शकत नाही यावर तुमचा किती विश्वास आहे...! "वा चित्राताई वा"...! अशी टीका केली आहे.

याला चित्र वाघ यांनी लगेच उत्तर दिले..चित्रा वाघ काय म्हणाल्या?

विद्या चव्हाण यांनी केलेल्या टीकेनंतर चित्र वाघ यांचं ट्विट आलं त्यांनी म्हंटल की, फक्त नाव "विद्या"असून विद्या येत नाही हो…सोलापूर प्रकरणात ना पिडीतेली भेटलो ना आजपर्यंत तिला पाहिलं पण तुम्हाला मात्र जीभ उचलली कि टाळ्याला लावण्याची घाईचं फार..बाकी सुनेला छळणार्या सासूच्या प्रसिद्धीसमोर बाकी सगळं फिकचं नाही का ? पुन्हा नादी लागू नका माझ्या तोंडावर आपटाल

विद्या चव्हाण यांना वाघ यांनी सुनेला छळणारी सासू असं म्हंटल्यानंतर त्यांना ते चांगलंच झोबल आणि मग हे ट्विटर वॉर एकमेकांची प्रकरणे बाहेर काढण्यापर्यंत येऊन पोहचले. विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्या थेट चरित्र्यावरच बोट ठेवत ''खोटारडेपणाचे चारित्र्याचे इथपर्यंत पोहोचला, त्यासाठी...! काय काय केले, कोणा कोणाशी संधान साधलं... हिम्मत असेल तर या...!'' अशी धमकीच दिली आहे.

छळवादी सासू म्हंटल्यानंतर विद्या चव्हाण काय म्हणाल्या..

विद्या चव्हाण यांनी म्हंटल आहे की, चित्राताई, वारंवार "छळवादी सासू" खोटा अपप्रचार तुम्ही करता...! छळ केलाच नाही तर होणार कुठून हे तुम्हालाही चांगलंच माहिती आहे...! पण तरीही खोटा नाटा पुरावा तरी खुलेआम सादर करा...! नाहीतर मी तुमच्या खोटारडेपणाचे चारित्र्याचे" इथपर्यंत पोहोचला, त्यासाठी...! काय काय केले, कोणा कोणाशी संधान साधलं...! हिम्मत असेल तर या...! "नादी लागू नका", पुन्हा मला धमकी...! तुमच्या नादी लागणारे "लंपट" असतात"...! त्यातले आम्हाला समजू नका...!सत्याची खडतर वाट चालत असताना पदोपदी अनेक अडथळे आले...! पण न डगमगता इथवर पोहोचले...! तुमचा खोटारडेपणा "सत्याशी" सामना करू शकत नाही...! हेच खरं...!

तर मागच्या दोन दिवसांपासून हे अशा प्रकारचे ट्विटर वॉर समाजमाध्यमांवर सुरु आहे. चित्रा वाघ व विद्या चव्हाण यांच्या या वॉरचा शेवट नक्की कुठे होते याची उत्सुकता नेटकर्यांना लागली आहे.

Updated : 23 July 2022 9:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top