Home > News > चाइल्ड पोर्नोग्राफी : CBI चे 14 राज्यात छापे; धक्कादायक बाब आली समोर

चाइल्ड पोर्नोग्राफी : CBI चे 14 राज्यात छापे; धक्कादायक बाब आली समोर

चाइल्ड पोर्नोग्राफी : CBI चे 14 राज्यात छापे; धक्कादायक बाब आली समोर
X

देशातील इंटरनेट आणि सोशल मीडियावर पोर्नोग्राफीच्या वाढत्या घटनांबाबत केंद्रीय तपास संस्थेने (सीबीआय) तपास तीव्र केला आहे. CBI ने कारवाईचा धडका लावला आहे. जे इंटरनेट आणि सोशल साइट्सवर चाइल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित सामग्री शेअर करतात आशा 50 हून अधिक ग्रुप आणि 5 हजारांहून अधिक लोकांचा सीबीआयने प्राथमिक तपासात शोध घेतला आहे, यामध्ये अनेक परदेशी नागरिकांचाही समावेश असून जवळपास 100 देशांचे मोबाईल क्रमांक सापडले आहेत.

या प्रकरणी CBI देशभरात कारवाई करत असून सीबीआयने मंगळवारी सुमारे 14 राज्यांमधील 77 ठिकाणी छापे टाकले आणि इंटरनेद्वारे चाइल्ड पोर्नोग्राफी केल्याप्रकरणी 10 आरोपींना ताब्यात घेतले आहे. या राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, ओडिशा, तामिळनाडू, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश यांचा समावेश आहे. सीबीआयने लहान मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित 23 वेगवेगळ्या प्रकरणात 83 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व आरोपी वेबपेजवर आक्षेपार्ह पोस्ट करून त्याच प्रसारित करत होते.

Updated : 18 Nov 2021 8:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top