Home > News > Video ; मुख्यमंत्र्यांनी वर्षा सोडलं मातोश्री कडे रवाना...

Video ; मुख्यमंत्र्यांनी वर्षा सोडलं मातोश्री कडे रवाना...

Video ; मुख्यमंत्र्यांनी वर्षा सोडलं मातोश्री कडे रवाना...
X

शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार आहे, पण ज्यांनी मी नको आहे, त्यांनी तसे येऊन सांगावे किंवा फोनवर बोलावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला. त्यानंतर आता त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरून आपलं सामान हलवत ते मातोश्रीकडे रवाना होत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी आज फेसबुक च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला या विधीने काय काय म्हंटल होत तर..कुणाकडे किती संख्या आहे हा विषय आपल्यासाठी गौण आहे. पण ती संख्या तुम्ही कशी जमवता, यालाही महत्त्व आहे. माझ्याविरोधात अविश्वास ठराव येण्याची वेळ येऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. आपल्या भाषणात त्यांनी काही आमदारांना जबरदस्तीने नेण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच काही आमदार हे आपल्या संपर्कात असून त्यांना परत यायचे आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांवर पाळत ठेवण्यात आली होती, तसेच काही आमदारांना जबरदस्तीने नेण्यात आले असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. " मुख्यमंत्रीपदी मी नको असेल तर तसे मला स्पष्ट सांगा, येऊन सांगा किंवा फोनवर सांगा" असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेस आण राष्ट्रवादीने मला विरोध केला असता तर वाईट वाटले नसते, पण माझ्याच लोकांनी मला विरोध केला आहे, याचा धक्का बसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना शरद पवार यांनी मला मुख्यमंत्री होण्याची अट घातली, त्यामुळे मला मुख्यमंत्री व्हावे लागले. पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको असेल तर काय करणार? असा सवाल त्यांनी विचारला आहे. सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा माझ्याशी येऊन का बोलला का, नाहीत? असेही त्यांनी म्हटले आहे.

मी आता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार पण ज्यांना मी नको आहे, त्यांनी माझ्यासमोर येऊन तसे सांगावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. एवढेच नाही तर भाषण संपताच आपण आपला मुक्काम वर्षावरुन मातोश्रीवर हलवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. जे आमदार गायब आहेत त्यांनी येऊन माझ्या राजीनाम्याचे पत्र राजभवनावर न्यावे, कारण आपल्याला कोरोना झाला आहे. एवढेच नाही तर जर मी राज्य आणि पक्ष चालवण्यास नालायक आहे असे शिवसैनिकांनी सांगितले तर मी शिवसेना पक्षप्रमुख पद सोडण्यासही तयार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडत मातोश्रीकडे रवाना झाले आहेत.


Updated : 22 Jun 2022 4:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top