Home > News > छत्तीसगढ : DSP शिल्पा साहू गर्भवती असतानाही भर उन्हात जनतेच्या हितासाठी रस्त्यावर... सोशल मीडियावर होतंय कौतुक

छत्तीसगढ : DSP शिल्पा साहू गर्भवती असतानाही भर उन्हात जनतेच्या हितासाठी रस्त्यावर... सोशल मीडियावर होतंय कौतुक

छत्तीसगढमध्ये लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दंतेवाडा डीएसपी शिल्पा साहू ५ महिन्याच्या गरोदर असूनही भर उन्हात आपलं कर्तव्य बजावत आहे. सोशल मीडियावर कौतुक होणाऱ्या डीएसपी शिल्पा साहू कोण आहेत? जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी

छत्तीसगढ : DSP शिल्पा साहू गर्भवती असतानाही भर उन्हात जनतेच्या हितासाठी रस्त्यावर... सोशल मीडियावर होतंय कौतुक
X

देशात करोना विषाणूचे संक्रमण मोठ्याप्रमाणात होत आहे. या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर देशात अनेक राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. छत्तीसगढ मध्ये १३ जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियावर छत्तीसगढमधल्या दंतेवाडा येथील डीएसपी शिल्पा साहू यांचा ड्यूटी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. शिल्पा साहू ५ महिन्याच्या गर्भवती आहेत.

गर्भवती असताना देखील भर उन्हात आपली ड्युटी,कर्तव्य चोखपणे पार पाडत आहे. या व्हिडिओत त्या रस्त्यावर विनाकारण येणाऱ्या लोकांना चेक करत सूचना देत आहेत. की करोनाच्या गाईडलाईन्स पाळा.. करोना व्हायरस मोठ्याप्रमाणात पसरत आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी तुम्ही स्वतःची आणि आपल्या घरच्यांची काळजी घ्या. तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा नियमितपणे वापर करा. अशा सूचना रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालक तसेच लोकांना करत आहेत. त्यांचा हा कामाप्रति असलेला जज्बा आणि हिम्मत अनेकांना प्ररेणा देणारं आहे. आपल्या जीवाची परवा न करता भर उन्हात जनतेच्या हितासाठी गरोदरपणातही शिल्पा साहू आपलं कर्तव्य पार पाडत आहे. त्यांच्या कामाची दखल घेत सोशल मीडियावर त्यांचे कौतुक होत आहे.

गेल्या वर्षभरापासून करोना विषाणू देशात धुमाकूळ घालत आहे. या व्हायरसशी देशातील आरोग्य यंत्रणा, डॉक्टर्स, नर्स ज्या पद्धतीने कोविड योद्धा म्हणून कार्यरत आहेत त्याच पद्धतीने देशातील पोलीस कर्मचारीही रात्रंदिवस रस्त्यावर उतरून आपलं काम चोखपणे बजावत आहेत. छत्तीसगढ चे सीनियर आईपीएस अधिकारी दीपांशु काबरा ने ट्विट करत दंतेवाडा डीएसपी शिल्पा साहू गर्भवती असूनही कोविड काळात भर उन्हात आपलं कर्तव्य ड्यूटी चोखपणे बजावत आहेत.

कोण आहे डीएसपी शिल्पा साहू

डीएसपी शिल्पा साहू छत्तीसगढमधल्या नक्सली भागात काम करतात. त्यांच्या कामामुळे त्या नेहमी माध्यमांच्या चर्चेत राहतात. शिल्पा यांचे पति देवांश सिंह राठोर हे देखील डीएसपी आहे. ट्रेनिंगच्या दरम्यान त्यांची मैत्री झाली आणि शिल्पा-देवांश यांनी लग्न केलं. ते दोघेही नक्सली ऑपरेशन साठी सोबत जायचे. सध्या पति देवांश हे बस्तर बटालियन ला लीड करतात. तर शिल्पा दंतेश्वरी फाइटर ला लीट करते.

दरम्यान, छत्तीसगढ मध्ये सोमवारी 13 हजार 834 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले. 11,815 लोक करोनातून बरे झाले आहेत. तर 165 लोकांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. सध्या छत्तीसगढ मध्ये 1 लाख 29 हजार एक्टिव केसेस आहेत.

Updated : 20 April 2021 11:20 AM GMT
Next Story
Share it
Top