Home > News > गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी रेल्वे प्रशासन काय करतंय पहा...

गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी रेल्वे प्रशासन काय करतंय पहा...

गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी रेल्वे प्रशासन काय करतंय पहा...
X

यंदा सप्टेंबर महिन्यात गणेश उत्सव आहे. गणेश उत्सवासाठी अजून दोन महिने जरी असले तरीसुद्धा मुंबईकर चाकरमाने आतापासूनच कोकणात जाण्याचं नियोजन करत आहेत. कारण आपण दरवर्षी पाहतो गणपतीला कोकणात जाणाऱ्या लोकांची संख्या मोठी असते त्यामुळे ट्रेनला प्रचंड गर्दी होते. अनेकांना वेळेत तिकीट सुद्धा मिळत नाही. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासन दरवर्षी नियोजन करत असतं. यंदा देखील रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी काही खास नियोजन केले आहे.. थोडं थांबा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा...

गणपतीला कोकणात जाण्यासाठी अनेकांना फार कसरत करावी लागते. कोकणात जाणाऱ्या रेल्वे, बस या काळात तुडुंब भरलेल्या असतात. तुम्ही कोकणात जाण्यासाठी ऐनवेळी तिकीट काढण्याचा विचार करत असाल तर ते शक्य होईलच याबाबत कोणतीही गॅरंटी नाही. या काळात रेल्वेने कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते म्हणून दरवर्षी रेल्वे प्रशासनाकडून गणेशचतुर्थी निमित्त काही विशेष उपाययोजना केल्या जातात. यावर्षी मध्य रेल्वेने कोकणात जाण्यासाठी आणखी काही ज्यादा आणि विशेष गाड्या सोडण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आता कोकण रेल्वे मार्गावर आणखी काही नवीन गाड्या धावणार आहेत. प्रवाशांना गैरसोय होऊ नये म्हणून 13 सप्टेंबर पासून या गाड्या सोडण्यात येणार आहेत.

रेल्वे गाडी क्रमांक 01155 ही दिवा जंक्शनहून सप्टेंबर महिन्यात 13 ते 19 आणि 22 व 2 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7.45 वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी चिपळूण येथे रात्री 1:25 वाजता पोहचेल. गाडी क्र. 01156 ही रेल्वे सप्टेंबर 14 ते 20, मग 23 व 3 ऑक्टोबरला चिपळूणहून दुपारी 1:00 वाजता सुटून त्याच दिवशी दिवा येथे संध्याकाळी 7:00 वाजता पोहोचेल.

Updated : 6 July 2023 5:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top