Home > News > चांद्रयान-3 आता चंद्रापासून फक्त 25 किमी अंतरावर...

चांद्रयान-3 आता चंद्रापासून फक्त 25 किमी अंतरावर...

चांद्रयान-3 आता चंद्रापासून फक्त 25 किमी अंतरावर...
X

चांद्रयान-3 चे दुसरे आणि अंतिम डिबूस्टिंग ऑपरेशन रविवारी सकाळी 1.50 वाजता पूर्ण झाले. या ऑपरेशननंतर, चंद्रापासून लँडरचे किमान अंतर 25 किमी आणि कमाल अंतर 134 किमी आहे. डीबूस्टिंगमध्ये, स्पेसक्राफ्टचा वेग कमी केला जातो. इस्रोने ट्विट केले आहे की, लँडर आता अंतर्गत तपासणी करेल आणि सूर्योदय होईपर्यंत लँडिंगच्या ठिकाणी थांबेल. येथूनच 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:45 वाजता सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न केला जाणार आहे.त्यादरम्यान लँडिंगमध्ये अडचण आल्यास, चांद्रयान-३ ला महिनाभरानंतर पुन्हा प्रयत्न करावे लागतील कारण 28 दिवसांनी चांद्रयान-3 ला दुसऱ्या सकाळची वाट पाहावी लागणार आहे. प्रज्ञान रोव्हर चंद्रावर अशोक स्तंभाची छाप सोडणार आहे... चांद्रयान-1 आणि चांद्रयान-2 मोहिमांचे प्रकल्प संचालक एम. अण्णादुराई यांच्या मते, 23 ऑगस्टच्या संध्याकाळी चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगची शेवटची 15-20 मिनिटे सर्वात कठीण आहे. त्यानंतर लँडरला 30 किमी उंचीवरून चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचण्यासाठी 15 ते 20 मिनिटे लागतील.यानंतर, सहा चाकी प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरमधून रॅम्पमधून बाहेर येईल आणि इस्रोकडून आदेश मिळताच चंद्राच्या पृष्ठभागावर जाईल. या दरम्यान, भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ आणि इस्रोचा लोगो चाकांच्या माध्यमातून चंद्राच्या मातीवर आपली छाप सोडेल.लँडरने चंद्राची छायाचित्रे घेतली...यापूर्वी 17 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चे प्रोपल्शन मॉड्यूल लँडर-रोव्हरपासून वेगळे करण्यात आले होते. यादरम्यान, लँडरवर बसवलेल्या कॅमेऱ्याने प्रोपल्शन मॉड्यूलच्या फोटोसह चंद्राची छायाचित्रे घेतली.

Updated : 20 Aug 2023 6:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top