Home > News > राज ठाकरेंनी ज्या चांद्रयानाचा उल्लेख केला ते चांद्रयान लवकरच चंद्रावर उतरणार...

राज ठाकरेंनी ज्या चांद्रयानाचा उल्लेख केला ते चांद्रयान लवकरच चंद्रावर उतरणार...

राज ठाकरेंनी ज्या चांद्रयानाचा उल्लेख केला ते चांद्रयान लवकरच चंद्रावर उतरणार...
X

राज ठाकरे यांचं कालचं भाषण तुम्ही ऐकलं असेल. महाराष्ट्रातील खड्ड्यांची दुरावस्था पाहून राज ठाकरे यांनी मिश्किलपणे भारताने जे चंद्रयान चंद्रावरती अभ्यास करण्यासाठी पाठवलं ते महाराष्ट्रात पाठवलं असतं तर बरं झालं असतं असं म्हटलं.., पण भारताने जे चंद्रयान चंद्रावर पाठवला आहे ते तिथे नक्की काय अभ्यास करणार आहे? त्याचा आपल्याला कसा फायदा होणार आहे? नक्की राज ठाकरे यांनी उल्लेख केलेली ही चंद्रयान मोहीम काय आहे? या सगळ्याविषयी तुम्ही आत्तापर्यंत बरंच ऐकलं असेल, पाहिला असेल किंवा वाचले देखील असेल. हे चंद्रयान लवकरच चंद्रावरती उतरणार आहे. सध्या नक्की या चंद्रयानाची काय परिस्थिती आहे? ते कधी चंद्रावरती कधी उतरेल? व ते उतरण्यासाठी कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे? हेच आपण आता पाहणार आहोत..

ISRO चांद्रयान-3 चे प्रोपल्शन मॉड्यूल आज म्हणजेच 17 ऑगस्ट रोजी लँडर आणि रोव्हरपासून वेगळे होणार आहे. आता प्रोपल्शन मॉड्यूल 3-6 महिने चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणाऱ्या रेडिएशनचा अभ्यास करेल तर लँडर-रोव्हर 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5:47 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. येथे ते 14 दिवस पाणी व बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करणार आहे.

सध्या चांद्रयान अशा वर्तुळाकार कक्षेत फिरत आहे ज्यामध्ये त्याचे चंद्रापासून किमान अंतर 153 किमी आणि कमाल अंतर 163 किमी आहे. 16 ऑगस्ट रोजी सकाळी 08:30 च्या सुमारास इस्रोच्या शास्त्रज्ञांनी वाहनाच्या थ्रस्टरला काही काळासाठी चालू केले होते. यानंतर चांद्रयान 153 किमी X 163 किमीच्या जवळपास वर्तुळाकार कक्षेत आले होते. यापूर्वी ते 150 किमी x 177 किमीच्या कक्षेत होते. प्रोपल्शनपासून विभक्त झाल्यानंतर लँडर डीबूस्ट केले जाईल. म्हणजेच त्याचा वेग कमी होईल. येथून चंद्राचे किमान अंतर 30 किमी असेल. 23 ऑगस्ट रोजी सर्वात कमी अंतरावरून चांद्रयानचे सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न केला जाईल.

लँडर ३० किमी उंचीवरून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेपर्यंत ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असेल. म्हणजेच प्रदक्षिणा करत असताना त्याला अचानक ९० अंशाच्या कोनात चंद्राकडे जावे लागेल. लँडिंग प्रक्रियेच्या सुरुवातीला, चांद्रयान-3 चा वेग सुमारे 1.68 किमी प्रति सेकंद असेल. लँडरच्या डीबूस्टरच्या मदतीने ते कमी केले जाईल आणि पृष्ठभागावर सुरक्षितपणे उतरण्याचा प्रयत्न केला जाईल.

हे वाहन ५ ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत पोहोचले...

22 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7.15 च्या सुमारास चंद्राच्या कक्षेत पोहोचले. चांद्रयान पहिल्यांदा चंद्राच्या कक्षेत दाखल झाले तेव्हा त्याची कक्षा १६४ किमी x १८,०७४ किमी होती. कक्षेत प्रवेश करताना त्याच्या ऑनबोर्ड कॅमेऱ्यांनी चंद्राची छायाचित्रेही टिपली. इस्रोने त्याचा व्हिडिओ बनवून आपल्या वेबसाईटवर शेअर केला आहे. या चित्रांमध्ये चंद्राचे खड्डे स्पष्टपणे दिसत आहेत.

Updated : 17 Aug 2023 7:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top