Home > News > ''ती बाई काय होती...शिवसैनिकांची अक्कल गुडघ्यात असते" चंद्रकांत खैरेंचा नवनीत राणांना इशारा

''ती बाई काय होती...शिवसैनिकांची अक्कल गुडघ्यात असते" चंद्रकांत खैरेंचा नवनीत राणांना इशारा

ती बाई काय होती...शिवसैनिकांची अक्कल गुडघ्यात असते चंद्रकांत खैरेंचा नवनीत राणांना इशारा
X

मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा ही दोन नावं चर्चेत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला. आणि त्यानंतर राज्याचे राजकारण चांगलंच तापले आहे. याच तापलेल्या राजकारणात नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले. त्यानंतर त्यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलं.

या सगळ्या प्रकारानंतर त्यांना चौदा दिवसांची कोठडी झाली आणि त्यांना नुकताच कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. आता जामीन मंजूज झाल्यानंतर देखील त्यांची चर्चा काही कमी झालेली नाही. कारण जामीन मंजूर करत असताना न्यायालयाने त्यांना काही अटी-शर्ती घालून दिल्या आहेत. त्यांना सशर्त जामीन देण्यात आला आहे. पण आज कोर्टानं घातलेल्या अटीचे नवनीत राणा यांनी उल्लंघन केले आल्याची त्यांच्यावर टीका होत आहे. याच सगळ्या प्रकरणावरून शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी नवनीत राणा यांच्यावर सडकून टीका केली आहे, ही टीका करताना त्यांनी, ती बाई कशी होती आम्हाला सगळं माहीत आहे. शिवसैनिकांची अक्कल गुडघ्यात असते" असं म्हणत त्यांनी थेट त्यांना इशाराच दिला आहे.

चंद्रकांत खैरे हे आज बीडच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान त्यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे. "नवनीत राणा यांच्याबद्दल मी काहीही बोलणार नाही, कारण मी काही बोललो तर मग ते परत व्हायरल होईल. मला त्या बाईचा राग आलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल ती बाई काहीही बोलते. आहे ही बाई कशी होती हे आम्हाला सगळं माहित आहे. आम्ही शिवसैनिक, आमच्या डोक्यात वेगळी अक्कल असते, गुडघ्यामध्ये आमची अक्कल असते. आम्ही जाऊन काहीही करू शकतो" असं चंद्रकांत खैरे यांनी म्हणतात नवनीत राणा यांच्यावर घणाघात केला आहे.

"नवनीत राणा ही पक्ष बदलणारी बाई आहे. जातीचे खोटे प्रमाणपत्र आणून निवडणूक लढवली. उद्धव ठाकरे हे आमचे प्रमुख आहेत. आमचे दैवत आहेत. त्यांच्याबद्दल काही पण बोलायचं म्हणजे काय, कोण सहन करेल. ती बाई काय होती हे माहित आहे ना सगळं" असं म्हणत त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

Updated : 8 May 2022 4:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top