Home > News > सैन्यदलात नोकरीचे स्वप्न पूर्ण करा.. | Central Reserve Police Force (CRPF)

सैन्यदलात नोकरीचे स्वप्न पूर्ण करा.. | Central Reserve Police Force (CRPF)

सैन्यदलात नोकरीचे स्वप्न पूर्ण करा.. | Central Reserve Police Force (CRPF)
X

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) ने गट ब आणि गट क च्या 212 पदांसाठी भरती काढली आहे. CRPF ने जारी केलेल्या भरती अधिसूचनेनुसार, रेडिओ ऑपरेटर, क्रिप्टो, तांत्रिक आणि नागरी विभागांमध्ये उपनिरीक्षकाच्या एकूण 51 पदांची भरती केली जाणार आहे. तसेच तांत्रिक आणि ड्राफ्ट्समन विभागात सहाय्यक उपनिरीक्षकाच्या 161 पदांची भरती करण्यात येणार आहे.

विशेष तारखा

अर्ज सुरू होण्याची तारीख: १ मे २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 मे 2023

शैक्षणिक पात्रता

उपनिरीक्षक (रेडिओ ऑपरेटर): मान्यताप्राप्त विद्यापीठातून गणित, भौतिकशास्त्र किंवा संगणक विज्ञान या विषयांसह पदवीधर.

SI क्रिप्टो: गणित आणि भौतिकशास्त्रातील पदवी.

एसआय टेक्निकल आणि सिव्हिल: संबंधित ट्रेडमध्ये बीई/बीटेक पास.

ASI : 12वी पास. संबंधित क्षेत्रात डिप्लोमा आवश्यक.

वायोमर्यादा काय असेल?

SI पदांसाठी, उमेदवारांचे वय अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार 21 मे 2023 रोजी 30 वर्षांपेक्षा कमी असावे. तर ASI पदांसाठी कमाल वयोमर्यादा २५ वर्षे आहे.

अर्ज शुल्क

अर्जादरम्यान, उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून 200 रुपये शुल्क भरावे लागेल. मात्र, CRPF ने ASI पदांसाठी फक्त 100 रुपये शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. SC/ST आणि सर्व प्रवर्गातील महिला उमेदवारांना कोणत्याही पदासाठी शुल्क आकारले जाणार नाही.

याप्रमाणे अर्ज करा

CRPF द्वारे जाहिरात केलेल्या उपनिरीक्षक आणि सहाय्यक उपनिरीक्षक पदांच्या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार अधिकृत भरती पोर्टल rect.crpf.gov.in वर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतील.

Updated : 29 April 2023 2:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top