Home > News > CRPF मध्ये मोठी भरती : 10 वी पास उमेदवार 2 मे पर्यंत अर्ज करू शकतील, 69 हजार पर्यंत पगार..

CRPF मध्ये मोठी भरती : 10 वी पास उमेदवार 2 मे पर्यंत अर्ज करू शकतील, 69 हजार पर्यंत पगार..

CRPF मध्ये मोठी भरती : 10 वी पास उमेदवार 2 मे पर्यंत अर्ज करू शकतील, 69 हजार पर्यंत पगार..
X

सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) ने 9 हजार 212 कॉन्स्टेबलच्या रिक्त जागांसाठी अर्ज करण्याची तारीख 7 दिवसांनी वाढवली आहे. अशा परिस्थितीत, आता भरती प्रक्रियेत सामील होण्यासाठी, 10वी उत्तीर्ण उमेदवार सीआरपीएफच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन 2 मे पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांची निवड शारीरिक चाचणीसह लेखी चाचणीच्या आधारे केली जाईल.

रिक्त जागा तपशील..

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) ने कॉन्स्टेबल टेक्निकलमध्ये या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 9 हजार 212 पदांची भरती प्रकिया सुरु केली आहे. यामध्ये पुरुष उमेदवारांना 9 हजार 105 तर महिला उमेदवारांना 107 पदे देण्यात येणार आहेत.

वय मर्यादा?

भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराचे वय 21 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावे. दुसरीकडे, कमाल वयोमर्यादेत ओबीसी उमेदवारांना ३ वर्षे आणि एससी आणि एसटी उमेदवारांना ५ वर्षे सूट देण्यात आली आहे.

काय असणे गरजेचं आहे?

सीटी-ड्रायव्हर - केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून किमान मॅट्रिक किंवा समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे अवजड वाहतूक वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे आणि भरतीच्या वेळी त्याने ड्रायव्हिंग चाचणी उत्तीर्ण केलेली असावी.

सीटी-मेकॅनिक मोटार वाहन – मान्यताप्राप्त मंडळाकडून 10+2 परीक्षा प्रणालीमध्ये किमान मॅट्रिक किंवा 10वी उत्तीर्ण किंवा समकक्ष तांत्रिक पात्रता मेकॅनिक मोटर वाहनात 02 वर्षांचे ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवारांना संबंधित ट्रेडमधील 1 वर्षाचा अनुभवही असावा.

Updated : 20 April 2023 3:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top