Home > News > विधवा महिलांसोबत मकर संक्रांत...

विधवा महिलांसोबत मकर संक्रांत...

वाशीम येथे सावित्रीबाई फुले महिला मंचने विधवा महिलांसोबत मकर संक्रात साजरी करुन समाजात एक चांगला पायंडा पाडला आहे. विधवा आणि परितक्त्या महिलांकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टीकोण बदल्याण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विधवा महिलांसोबत मकर संक्रांत...
X

आजच्या आधुनिक युगातही वर्तमान समाजव्यवस्थेत विधवा व परितक्त्या महिलांकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टीकोण वेगळा आहे. कुठल्याही सामाजिक कार्यक्रमात या महिलांना सहभागी करून घेतले जात नाही. मात्र रूढी परंपरेला बगल देत वाशीम येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा सावित्रीबाई फुले महिला मंचच्या अध्यक्षा किरण गिऱ्हे यांनी पुढाकार घेऊन विधवा आणि परीतक्त्या महिलांसोबत मकर संक्राती नंतर साजरा होणारा हळदी कुंकु समारोह साजरा करून त्यांचा सन्मान केला आहे.

मकर संक्रांतीचा महिना हा महिलांसाठी आनंदाची पर्वणीच असते. सर्वत्र सुवासिनी, सुंदर कपडे, दागदागिने घालून एकत्र येताना दिसतात. एकंदरीत या काळात सर्वत्र आनंदाचे उल्हासाचे वातावरण असते. पण समाजातला एक महिला वर्ग असा आहे की, ज्यांना काही कारणास्तव समाजाने नाकारले आहे किंवा त्यांच्या पतीचे छत्र हरवले आहे. अशा महिला सगळ्या आनंदापासून दूर असतात. अनेक धार्मिक रूढीपरंपरा राबवून त्यांना अशा कार्यक्रमात मोलाचे स्थान आणि त्यांचा सन्मान करण्याचा उपक्रम सावित्रीबाई फुले महिला मंचने राबवून महिलांचा सन्मान केला आहे.

अखिल भारतीय माळी महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा सावित्री महिला मंचचे अध्यक्ष किरण समाधान गिन्हे यांनी आपल्या निवासस्थानी विधवा व परितक्ता महिलांना आमंत्रित करून मकर संक्रांती निमित्त त्यांना भेट वस्तू देऊन तिळगुळ देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला.

Updated : 28 Jan 2023 12:48 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top