Home > News > बुलढाणा: अवैध दारू विक्री विरोधात महिलांनी पुकारला एल्गार...

बुलढाणा: अवैध दारू विक्री विरोधात महिलांनी पुकारला एल्गार...

बुलढाणा: अवैध दारू विक्री विरोधात महिलांनी पुकारला एल्गार...
X

बुलडाणा जिल्ह्यातील नांद्राकोळी गावात मागील १५ ते २० वर्षांपासून अवैध दारू विक्री सुरू होती. मात्र ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी व महिला बचत गटांनी पुढाकार घेवून दारू विक्री बंद केली होती. अवैध दारू विक्री विरोधात ठरावही घेण्यात आला. मात्र आता गावात पुन्हा दारू विक्री सुरु झाल्याने गावातील महिलांनी अवैध दारू विक्री विरोधात एल्गार पुकारला आहे.

गावात दारू बंदीचा निर्णय घेतल्यानंतर अवैध दारू विक्रेते ग्रामस्थांच्या निर्णयावर अंमल करून फक्त काही काळासाठी दारू विक्री बंद ठेवतात. तसेच नंतर पुन्हा दारू विक्री सुरु होते. त्यामुळे जेव्हा पैसे नसतात तेव्हा व्यसनी व्यक्ती आपल्या मुलाबाळांना, पत्नीला व आई-वडिलांना मारहाण करून घरातील धान्ये व भांडी विकून आपली व्यसनपूर्ती करतात. नवीन पिढीही व्यसनाच्या आहारी जात, असल्याचा आरोप महिला गावकऱ्यांनी केला आहे.

त्यामुळे अवैध दारू विक्री किती वेळा बंद व किती वेळा सुरू होत राहील, असा सवाल नांद्राकोळी येथील महिलांनी उपस्थित केला असून, या विक्रेत्यांविरूद्ध काही सुज्ज्ञ नागरिकांमध्येही रोष आहे. तसेच गावातील महिलांनी आज अवैध दारू विक्रेत्यांच्या घरी जावून आता तरी तुम्ही अवैध दारू विक्री बंद करा, अशी समज दिली आहे. अन्यथा पुन्हा एकदा दारू बंदी विषयी कायदेशीर लढा उभारणार असल्याचा इशारा सुद्धा गावातील महिलांनी यावेळी दिला.

Updated : 29 July 2021 1:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top