Home > News > निर्मला सीतारामन यांच्या नावावर आहे सर्वात मोठं अर्थसंकल्पीय भाषण करण्याचा विक्रम..

निर्मला सीतारामन यांच्या नावावर आहे सर्वात मोठं अर्थसंकल्पीय भाषण करण्याचा विक्रम..

निर्मला सीतारामन यांच्या नावावर आहे सर्वात मोठं अर्थसंकल्पीय भाषण करण्याचा विक्रम..
X

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज चौथा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. स्वातंत्र्यानंतर गेल्या 74 वर्षात 92 अर्थसंकल्प सादर करण्यात आले आहेत. कारण निवडणुकीच्या वर्षात अनेक वेळा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जातो आणि संपूर्ण अर्थसंकल्प निवडणुकीनंतर सादर केला जातो.

सर्वात दीर्घकाळ अर्थसंकल्पीय भाषण करण्याचा विक्रम..

दोन वर्षांपूर्वी निर्मला सीतारामन यांनी सर्वात मोठे अर्थसंकल्पीय भाषण केले होते. अर्थमंत्र्यांनी 1 फेब्रुवारी 2020 रोजी अर्थसंकल्पीय भाषण वाचण्यासाठी 2 तास 42 मिनिटे घेतली. या भाषणात 18 हजार 926 शब्द होते, तर प्रकृती ढासळल्यामुळे त्यांना शेवटची दोन पाने वाचता आली नाहीत. अन्यथा हे भाषण आणखी लांबू शकले असते.

2019 मध्ये निर्मला सीतारामन यांनी 2 तास 15 मिनिटांचे भाषण केले होते. तेव्हाही त्यांच्या नावावर सर्वाधिक प्रदीर्घ अर्थसंकल्पीय भाषण करण्याचा विक्रम होता. यापूर्वी हा विक्रम जसवंत सिंग यांच्या नावावर होता. 2003 मध्ये त्यांनी 2 तास 13 मिनिटांचे अर्थसंकल्पीय भाषण वाचले. या यादीत तिसरे नाव आहे अरुण जेटली यांचे, ज्यांनी 2014 मध्ये 2 तास 10 मिनिटे भाषण दिले होते.

सर्वात लहान अर्थसंकल्पीय भाषण 800 शब्दांचे होते

सर्वात लहान अर्थसंकल्पीय भाषणाबद्दल बोलायचे तर हा विक्रम हिरुभाई एम पटेल यांच्या नावावर 1977 साली आहे. त्यावेळी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी 800 शब्दांचे सर्वात लहान अर्थसंकल्पीय भाषण काही मिनिटांत पूर्ण केले.

Updated : 1 Feb 2022 5:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top