Home > News > 'सर्वांचा डीएनए हा एकच'; मोहन भागवत यांचे विधान काही गळी उतरत नाही: मायावती

'सर्वांचा डीएनए हा एकच'; मोहन भागवत यांचे विधान काही गळी उतरत नाही: मायावती

सर्वांचा डीएनए हा एकच; मोहन भागवत यांचे विधान काही गळी उतरत नाही: मायावती
X

नवी दिल्ली: भारतीय कोणत्याही धर्माचे असले तरी, त्या सर्वांचा डीएनए हा एकच असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानावरून आता राजकीय प्रतिक्रिया येत असून, बसपा प्रमुख मायावती यांनी मोहन भागवत यांच्यावर हल्ला चढवत भागवत यांचे विधान काही गळी उतरत नाही, असा टोला लगावला आहे.

माध्यमांसही बोलताना मायावती म्हणाल्यात की, आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी काल एका कार्यक्रमात, भारतातील सर्व धर्माच्या लोकांचे डीएनए एकच असल्याचं केलेलं विधान काही गळी उतरत नाही, आरएसएस, भाजपा कंपनीचे लोकं आणि भाजप शासित असलेल्या सरकार यांच्या बोलण्यात आणि कृतीत फरक सगळ्यांना पाहायला मिळत असल्याचं, मायावती म्हणाल्या.

तसेच, केंद्र व उत्तर प्रदेशसह ज्या राज्यांमध्ये भाजपा सरकार आहेत, त्यातील बहुतेक जण भारतीय संविधानाचे पालन करण्याऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्यावर चालत असल्याची चर्चा असल्याचाही मायावती म्हणाल्या.

Updated : 5 July 2021 11:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top