Home > News > रूढी परंपरांना फाटा देत विधवा वहिनीशी दिराने केला विवाह..

रूढी परंपरांना फाटा देत विधवा वहिनीशी दिराने केला विवाह..

रूढी परंपरांना फाटा देत विधवा वहिनीशी दिराने केला विवाह..
X

धुळे शहरातील अशोक कापसे यांची विधवा मुलगी कल्याणी आणि सटाणा येथील अंकुश वाटेकर यांचा घटस्फोटीत मुलगा सुनील यांचा विवाह सोहळा आज धुळ्यात पार पडला. या विधवा पुनर्विवाह सोहळ्यामुळे काशीकापडी समाजात नवा आदर्श निर्माण झाला असून या विवाह सोहळ्याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे देखील सहकार्य लाभले आहे.

संपूर्ण राज्यात विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी व्यापक स्वरूपात जनजागृती सुरू करण्यात आली आहे. तसेच यंदाचे वर्ष हे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्मृती शताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. छत्रपती शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाहाचे समर्थन केले होते, या पार्श्वभूमीवर धुळे येथील काशीकापडी समाजातील अशोक कापसे यांची विधवा मुलगी कल्याणी आणि सटाणा येथील अंकुश वाटेकर यांचा घटस्फोटीत मुलगा सुनील यांचा विवाह सोहळा नुकताच थाटामाटात संपन्न झाला.

नववधू कल्याणी यांचे पहिले पती योगेश वाटेकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता, तर सुनील हे घटस्फोटीत असून भारतीय सैन्यदलात पंजाब येथे नायक पदावर कार्यरत आहे या विवाह सोहळ्याला दोन्ही कुटुंबीयांनी होकार दिल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहकार्याने हा विवाहसोहळा संपन्न झाला. काशीकापडी समाज हा एक भटका समाज असून समाजात आज देखील अनेक अनिष्ट रूढी प्रथा परंपरा पाळल्या जातात समाजातील हा विधवा-पुनर्विवाह सोहळा येणाऱ्या पिढीसाठी आदर्श निर्माण करणारा ठरेल अशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.

Updated : 27 May 2022 1:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top